Home > News > Breaking the trend : माजी IMF मुख्य अर्थशास्त्रज्ञांच्या भिंतीवर गीता गोपीनाथ यांचा फोटो सामील.

Breaking the trend : माजी IMF मुख्य अर्थशास्त्रज्ञांच्या भिंतीवर गीता गोपीनाथ यांचा फोटो सामील.

Breaking the trend : माजी IMF मुख्य अर्थशास्त्रज्ञांच्या भिंतीवर गीता गोपीनाथ यांचा फोटो सामील.
X

गीता गोपीनाथ (Geeta Gopinath)यांनी यावर्षी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून इतिहास रचला. याआधी त्यांनी IMF मधील पहिल्या महिला मुख्य अर्थतज्ज्ञ बनून इतिहास रचला होता.गीता गोपीनाथ यांनी आता ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे.त्यामद्ये IMF चे सर्व मुख्य अर्थशास्त्रज्ञ असलेल्या भिंतीची प्रतिमा शेअर केली आहे."मी IMF च्या माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञांच्या भिंतीत सामील झाले,"असे तिने पुढे नमूद केले आहे.गीता गोपीनाथ या पहिल्या महिला IMF मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहे त्यामुळे हा फोटो शेअर करत आतापर्यंतचा ट्रेंड मोडल्याचा त्यांनी दाखवलं आहे. म्हैसूरमध्ये जन्मलेल्या गीता गोपीनाथ यांनी जानेवारी 2022 मध्ये उपव्यवस्थापकीय संचालकाची भूमिका स्वीकारली होती.गीता गोपीनाथ या मुख्य अर्थतज्ज्ञांच्या यादीत सामील झाल्यामुळे भारताच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा रोवला आहे.

अनेक ट्विटर वापरकर्त्यानी त्यांना शुभेच्छा मनापासून दिल्या आहेत. "तुम्ही केवळ ट्रेंड ब्रेकर नाही तर बरेच काही आहात. भारतासारख्या वंचित देशात राहणाऱ्या अब्जावधी लोकांसाठी तुम्ही आशास्थान आहात. भारतालाच नाही तर जगाला तुमचा अभिमान आहे .जगातील सामान्य लोकांच्या फायद्यासाठी तुम्हाला आणखी अनेक गौरव आणि प्रशंसा मिळो" अशी शुभेच्छा एक ट्विटर वापरकर्त्याने दिल्या आहेत .त्याचबरोबर "तुम्ही पात्र आहात! अर्थशास्त्राचा विचार करणाऱ्या सर्वांसाठी तुम्ही आनंदी स्मित आणता! कृपया भारतातील गरिबांचा विचार करा कारण त्यांना स्वतःचा विचार करता येत नाही अशा क्षमतेत ठेवण्यात आले आहे! तुमच्या कल्पना आणि शब्द खूप महत्त्वाचे असू शकतात! शुभेच्छा!" अशाप्रकारे ट्विटरवर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.

"माझा विश्वास आहे की गीता ही जगातील आघाडीच्या मॅक्रोइकॉनॉमिस्टपैकी एक म्हणून सर्वत्र ओळखली जाते.आम्हाला या क्षणी FDMD भूमिकेसाठी आवश्यक असलेले कौशल्य अचूकपणे आहे. खरंच, तिचे विशिष्ट कौशल्य- मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून फंडातील तिच्या अनेक वर्षांच्या अनुभवासह तिला अद्वितीयपणे पात्र बनवते. ती योग्य वेळी योग्य व्यक्ती आहे, "IMF च्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिवा म्हणाल्या.

गीता या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) पहिल्या महिला मुख्य अर्थतज्ज्ञ होत्या. कोविड-19 महामारी आणि लसीकरण लक्ष्य तसेच हवामान बदल शमन यावर नवीन IMF विश्लेषणात्मक संशोधनाचे नेतृत्व केले.कोरोना महामारीच्या काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं केलेलं काम अत्यंत महत्वाचं आहे. अशा अनेक आव्हानांचा सामना करण्यासाठी त्या नेहमी तत्पर असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे .





Updated : 7 July 2022 12:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top