Home > News > Happy Birthday दीपिका पादुकोण!

Happy Birthday दीपिका पादुकोण!

Happy Birthday दीपिका पादुकोण!
X

सध्या बॉलीवूमध्ये आपल्या अभिनयाच्या जादूनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोणचा आज वाढदिवस. बॉलिवूड मध्ये बाहेरून आलेले लोकं फार कमी यशस्वी होतात. मात्र दीपिका त्याला अपवाद आहे. अत्यंत कमी वेळात यशाचं शिखरं तिनं गाठलंय. सध्याच्या सर्वच बॉलीवूड अभिनेत्रींपैकी सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री दीपिका आहे.

दीपिका नेहमीच तिच्या चित्रपटांमधील वेगवेगळ्या भूमिकांमुळे आणि वेगवेगळ्या स्टाईल मुळे लाइमलाइटमध्ये असते. दीपिकाने २००६ मध्ये 'ऐश्वर्य' या कान्नड चित्रपटातून चित्रपट कारकिर्दीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने शाहरुख खान बरोबर २००७ मध्ये 'ओम शांती ओम' या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये आपल्या कामाला सुरूवात केली. ओम शांती ओम मधल्या तिच्या शांती या भूमिकेतून दीपिकाने बॉलीवुडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांवर आपली वेगळी छाप पाडली. करीना कपूर, विद्या बालन, कटरीना कैफ, राणी मुखर्जी यांसारख्या अभिनेत्रींच्या मांडियाळीत तिने बॉलीवुडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

बॉलीवुडमधील अनेक महत्वाचे चित्रपट करत, मागील १४ वर्षांमध्ये ती बॉलीवुडची आघाडीची अभिनेत्री झाली आहे. दीपिकाने आत्तापर्यंत बचना ऐ हसीनो, चांदनी चौक टू चायना, लव्ह आज कल, चेन्नई एक्स्प्रेस, ओम शांती ओम, हाऊसफुल्ल अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. ये जवानी है दिवानी या चित्रपटामध्ये रणबीर सिंग सोबत केलेली नैना तलवार ही भूमिका तरूणांना फार आवडलेली आहे.

ये जवानी है दिवानी मधले तिचे डायलॉग्स आजही सोशल मीडियावर व्हायरल होतात. नैनाच्या भूमिकेतील हळवा आणि त्यापेक्षाही बिंदास अंदाज प्रेक्षकांना विशेष भावला होता. हे जवानी है दिवानी नंतर रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांत अभिनेता रणवीर सिंह सोबत तिची केमॅस्ट्री अशी जुळली की रिल लाईफ स्वीट कपलचं रिअल लाईफ कपल मध्ये रूपांतर झालं.

आज दीपिकाचा ३५ सावा वाढदिवस आहे. अलिकडे आपल्या कामासाठी चर्चेत असणारी दीपिका सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. मात्र एनसीबीने केलेल्या चौकशीनंतर पुढे तिच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. अशा वादांपासून लांब राहत तिने प्रेक्षकांचं असंच मनोरंजन करावं याच मॅक्स वूमनच्या टिमकडून दीपिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Updated : 5 Jan 2021 7:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top