Home > News > नंदुरबारमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार, खासदार हिना गावित यांचा जिल्हाधिकाऱ्यावर गंभीर आरोप

नंदुरबारमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार, खासदार हिना गावित यांचा जिल्हाधिकाऱ्यावर गंभीर आरोप

नंदुरबारमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच भाजप खासदार डॉ. हिना गावित यांनी सांगितले असून संबंधितांवर सरकार कारवाई करणार का?

नंदुरबारमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार, खासदार हिना गावित यांचा जिल्हाधिकाऱ्यावर गंभीर आरोप
X

राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे सुरु असलेला गोंधळ आणि राजकारण पाहता नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर नंदुरबारच्या भाजप खासदार डॉ. हिना गावित यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा साठा जिल्हाधिकारी आणि रोटरी वेलनेस सेंटरने मिळून बाहेर विकल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

काय म्हणाल्या डॉ. हिना गावित ?

"नंदुरबार जिल्हा आणि मतदारसंघात गावोगावी कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. दवाखान्यांमध्ये आज रेमडेसिवीर इंजेक्शन्सची मोठी गरज भासत आहे. मला दिवसातून प्रत्येक रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दोन ते तीन वेळा फोन केला की, ताई आमच्याकडे इतके रुग्ण आहेत पण आमच्याकडे इंजेक्शन नाही. दवाखान्यांना इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार विनंती केली. पण जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कुठलाही निर्णय़ घेतला नाही.

अखेर मी पत्रकार परिषद घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त ५०० इंजेक्शन दवाखान्यांना दिले. रोटरी वेलनेस सेंटरला १ हजार इंजेक्शन देण्यात आले होते. दवाखान्यांकडून माहिती घेतल्यानंतर त्यांना इंजेक्शन मिळाले नसल्याचं कळालं. रोटरी वेलनेस सेंटरने हे इंजेक्शन बाहेरच्या बाहेर विकले. नंदुरबारचे जिल्हाधिकारी आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मिळून हे काम केल्याचा गंभीर आरोप हीना गावित यांनी केला आहे.

थेट रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन

सरकारला थेट रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याची मागणी हिना गावित यांनी केली असून सरकारने जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयात इंजेक्शन थेट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शनसाठी बाहेर फिरण्याची गरज नाही असं सरकारने सांगितल्याचं गावित यांनी म्हटलं आहे.

पाहा हा व्हिडिओ

Updated : 23 April 2021 4:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top