Home > News > भाजप नेत्याच्या विवाहबाह्य कारनाम्यात देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री...

भाजप नेत्याच्या विवाहबाह्य कारनाम्यात देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री...

भाजप नेत्याच्या विवाहबाह्य कारनाम्यात देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री...
X

भाजपचे सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेसोबतचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतो आहे. एका महिलेने स्वतः व्हिडिओ बनवत श्रीकांत देशमुख यांनी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत फसवणूक केली असल्याचं सांगितलं आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमातून समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार चार दिवसांपूर्वी घडला होता. आता हा सर्व प्रकार जनतेसमोर आल्यानंतर मग भाजपने त्यांचा राजीनामा घेतला आहे. या व्हायरल व्हिडिओ नंतर काही वेळातच श्रीकांत देशमुख आणि या पीडित महिलेचा एक ऑडिओ कॉल देखील व्हायरल झाला आहे. यामध्ये महिला श्रीकांत देशमुख यांनी फसवलं असल्याचा आरोप करत आहे. यावेळी देशमुख या महिलेला मी तुझ्याबरोबर असल्याचं सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. या संपूर्ण ऑडिओ क्लिप मध्ये एका ठिकाणी ही महिला हे सर्व प्रकरण तू जर देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं नाहीस तर मी स्वतः त्यांना सांगेल असं देखील म्हणत आहे.

पीडित महिला श्रीकांत देशमुख यामच्यासोबत फोनवर बोलताना म्हणत आहे की, या सगळ्या प्रकारणाचा जाब मी तुझ्या वडिलांना विचारणार आहे. सगळ्या लोकांना घेऊन तुझ्याकडे येणार आहे. तुझा तमाशा असा करणार की लक्षात ठेव तू.. देवेंद्र फडणवीसला जाऊन जर नाही सांगितलं तर मी स्वतः फोन करून सांगेन. तू काय तमाशा माझ्यासोबत केला आहेस. तुझं तिकीट गेलं खड्ड्यात असं या दोघांचं संभाषण सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. या दोघांच्या संभाषणात आता देवेंद्र फडणवीस यांचे नाव त्या महिलेने घेतल्यानंतर या सर्व प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा एन्ट्री झाली असल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरू आहे.

ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता श्रीकांत देशमुख यांनी, राजकीय विरोधकांकडून मला या सगळ्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

श्रीकांत देशमुख यांनी काय म्हंटल आहे..

महिलेने ग्रीन टीमध्ये गुंगीचे औषध मला दिले. त्यानंतर मग माझ्यासोबत हा आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करून चारित्र्यहननाचा प्रयत्न केला आहे. यामध्ये राजकीय विरोधकांच्या सहभागाची दाट शक्यता आहे. या महिलविरोधात आधीच मी ओशिवारा पोलीस ठाण्यात हनीट्रॅप आणि खंडणीचा गुन्हा दाखल केल्याचं देशमुख यांनी म्हटले आहे

श्रीकांत देशमुख कोण आहे?

श्रीकांत देशमुख हे पैलवान आहेत. ते नेहमीच वादग्रस्त राहिले आहेत. यापूर्वी २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत ते सांगोला मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाच्या तिकिटावर उभे होते. त्यावेळी निवडणूक प्रचारात आपल्यावर कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी आपल्यावर गोळीबार केल्याची तक्रार पोलिसांत नोंदविली होती. सोलापूर ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक राजेश प्रधान यांनी या प्रकरणाची तेवढ्याच गांभीर्याने दखल घेऊन चौकशी केली असता देशमुख यांनीच स्वतःविषयी मतदारांमध्ये सहानुभूती मिळविण्यासाठी खोटेपणाने गोळीबाराचा डाव रचल्याचे उजेडात आले होते. त्यामुळे देशमुख यांच्या विरूध्द गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही झाली होती. अलिकडे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून थेट जिल्हाध्यक्षपद मिळविले होते. श्रीकांत देशमुख व एका तरुणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांचा राजीनामा घेतला आहे.



नक्की काय प्रकार घडला?

एका महिलेने स्वतः हा व्हिडिओ बनवला आहे. ही तरुणी व श्रीकांत देशमुख हे एका रूम मध्ये बसले आहेत. ही तरुणी रडत रडत सांगत आहे की, हा जो व्यक्ती बसला आहे त्याने मला फसवलं आहे. आणि हा व्यक्ती श्रीकांत देशमुख आहे. या व्यक्तीने माझी फसवणूक केली आहे. हा व्यक्ती बायकोशी संबंध ठेवून माझ्याशी संबंध ठेवतो आहे. लग्न करतोय.. यापुढे ती बोलत असताना श्रीकांत देशमुख यांनी त्या महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतात. हा मोबाईल हिसकावून घेत असताना ती महिला म्हणत आहे की, नाही तू सोड. तू आता बघच. माझ्याशी का खोटं बोललास असा हा संपूर्ण व्हिडिओ आहे.

व्हिडिओ समोर येताच भाजपने केली कारवाई..

हा सर्व प्रकार समाज माध्यमातून समोर आल्यानंतर भाजपने श्रीकांत देशमुख यांच्यावर कारवाई केली आहे. पण हा सर्व प्रकार चार दिवसांपूर्वी घडला आहे. आता हा विडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर हा सर्व प्रकार जनतेसमोर आल्यानंतर मग श्रीकांत देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यांच्या राजीनाम्याचे पत्र भाजपने प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये म्हटला आहे की, भारतीय जनता पार्टी, सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून तो प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वीकारला आहे. मा. प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Updated : 13 July 2022 8:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top