Home > News > 'अधिकाऱ्यांनी कंपन्यांना पाठीशी घालू नये अन्यथा..'' श्वेता महाले अधिकाऱ्यांवर भडकल्या..

'अधिकाऱ्यांनी कंपन्यांना पाठीशी घालू नये अन्यथा..'' श्वेता महाले अधिकाऱ्यांवर भडकल्या..

अधिकाऱ्यांनी कंपन्यांना पाठीशी घालू नये अन्यथा.. श्वेता महाले अधिकाऱ्यांवर भडकल्या..
X

बुलढाणा जिल्ह्यात खंतांचा कुत्रीम तुटवडा निर्माण करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना खते विकतांना "हे घ्यायचे असंल तर ते घ्याव लागेल" अशी लिंकीग ची जबरदस्ती करण्यात येत आहे. तुम्ही स्वतः शेतकऱ्यांचे पुत्र आहेत हे लक्षात घ्या. शेतकऱ्यांशी गद्दारी करू नका. जर कंपन्यानी शेतकऱ्यांवर बळजबरी केली भाजप आंदोलकात्मक पवित्रा घेतला जाईल. शेतकऱ्यांशी गद्दारी आणि बेइमानी करणाऱ्या कंपन्यांना अन् त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही अशी ईशारा आमदार श्वेताताई महाले यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी जिल्ह्यातील खते , बियाणे व कीटकनाशके कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली यावेळी त्या बोलत होत्या. जिल्ह्यात किती खते उपलब्ध आहेत याचा आढावा बैठकीच्या सुरुवातील त्यानी घेतला. जिल्ह्यात मुबलक प्रमाणात खते उपलब्ध असल्याचा दावा जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकारी अनिसा महाबळे यांनी केला. यावर खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असतील तर शेतकऱ्यांना लिंकीग ची जबरदस्ती कशाला असा सवाल श्वेताताईंनी उपस्थित केला. कृषी केंद्र चालकांना विचारल्यावर ते लिंकीग साठी कंपन्या दबाव आणत असल्याचे सांगतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कंपन्यांना पाठीशी घालू नये असे श्वेताताई म्हणाल्या. जिल्हा कृषी विभाग, कृषी विषयक कंपन्या, कृषी केंद्र चालक यांच्यात कोणताही समन्वय नसल्याचा आरोप यावेळी श्वेता महाले यांनी केला.

येणाऱ्या काही दिवसांत शेतकरी मोठ्या संख्येने खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रात जाणार आहे. आता यापुढे जर लिंकिंग होत असल्याचा प्रकार आमच्या कानावर आला तर कृषी केंद्र चालकासोबत कंपनीला सुद्धा दोषी धरल्या जाईल. त्यामुळे होणाऱ्या कारवाईला तुम्हाला समोर जावे लागेल. कंपनी आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचे लक्षात आल्यास अधिकाऱ्यांची सुद्धा गय केली जाणार नाही. त्यामुळे अन्नदात्याशी गद्दारी करू नका असे आवाहन आमदार श्वेताताईनी केले. शेतकऱ्यांची लूट थांबली नाही तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. या बैठकीला जिल्हा परिषद कृषी विभागाचे अधिकारी, खते बियाणे व कीटकनाशक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Updated : 18 Jun 2022 3:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top