Home > News > श्रीकांत देशमुख विरोधात बलात्काराचा गुन्हा; चित्रा वाघ आता आक्रमक होणार का?

श्रीकांत देशमुख विरोधात बलात्काराचा गुन्हा; चित्रा वाघ आता आक्रमक होणार का?

श्रीकांत देशमुख विरोधात बलात्काराचा गुन्हा;  चित्रा वाघ आता आक्रमक होणार का?
X

भाजपचे सोलापूर जिल्हा माजी अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात एका महिलेने फसवणूक करून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप एक व्हिडिओ करून केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. महिला अत्याचारा विरोधात आक्रमक असणाऱ्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील या महिलेला पोलिसात गुन्हा दाखल करण्यास सांगत लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले होते. आता श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून चित्र वाघ स्वपक्षातील माजी पदाधीकाऱ्या विरोधात आक्रमक होणार का? कि आपल्या पक्षातील आहे म्हणून त्या शांत बसणार? असा प्रश्न उपस्तित केला जात आहे.

राज्यात आता शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. श्रीकांत देशमुख प्रकरण होण्याआधी एक प्रकरण घडले होते. देखील शिंदे गटात सामील झालेले आमदार संजय राठोड यांच्यवर बीड जिल्ह्यातील परळी येथील टिक टॉक स्टार पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्ये प्रकरणी भाजपने गंभीर आरोप केले होते. संजय राठोड यांच्या विरोधात चित्र वाघ यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर राठोड यांना मंत्रिपदावरून पाय उत्तर व्हावे लागले होते. आता सरकारमध्ये एकत्र आल्यानंतर राठोड यांच्यावर केलेल्या आरोपांबद्दल चित्र वाघ काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले होते. याविषयी चित्रा वाघ यांनी भाजपसोबत युतीत आल्यावर मी केस मागे घेतलेली नाही. माझा लढा चालूच राहणार आहे. असं म्हंटल आहे. आता श्रीकांत देशमुख विरोधात देखील तितक्याच आक्रमक पणे चित्र वाघ लढा देणार का?

श्रीकांत देशमुख विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल...

भारतीय जनता पक्षाचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशमुख यांच्या विरोधात एका महिलेने आरोप केले होते. त्यानंतर श्रीकांत देशमुख यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.

याबाबत एका महिलेने डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर श्रीकांत अप्पासाहेब देशमुख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पीडीत महिला पुण्यातील आहे. देशमुख यांची महिलेशी ओळख झाली होती. त्या वेळी गे ल्या तीन वर्षांपासून पत्नीशी मतभेद झाले आहेत. त्यामुळे पत्नीला लवकरच घटस्फोट देणार असल्याची बतावणी देशमुख यांनी महिलेकडे केली होती. त्यानंतर देशमुख यांनी बलात्कार केल्याचे पीडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

देशमुख यांनी महिलेला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास महिला तसेच तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. डेक्कन पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

Updated : 18 July 2022 2:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top