Home > News > कोरोना परिस्थिती सांभाळतांना ठाकरे सरकारच्या नाकी नऊ; भारती पवारांची टीका

कोरोना परिस्थिती सांभाळतांना ठाकरे सरकारच्या नाकी नऊ; भारती पवारांची टीका

कोरोना परिस्थिती सांभाळताना महाविकास आघाडी सरकारच्या नाकी नऊ

कोरोना परिस्थिती सांभाळतांना ठाकरे सरकारच्या नाकी नऊ; भारती पवारांची टीका
X

मुंबई: राज्यात निर्माण झालेल्या लसीच्या तुटवड्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप नेत्या आणि दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी लसीकरण तुटवड्याला राज्य सरकार जवाबदार असल्याचं म्हणत महाविकास आघाडीवर सरकारवर निशाणा साधला आहे.

खासदार पवार यांनी ट्विट करता म्हंटलं आहे की, केंद्राकडून लसींचा पुरवठा होतोय पण, राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनाचा उत्तर महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना फटका बसत आहे. कोरोना संक्रमणाची भयानक परिस्थिती सांभाळताना राज्य शासनाच्या नाकी नऊ आले असल्याचा आरोप खासदार पवार यांनी केला आहे.

केंद्र सरकारच्या वतीने सुरू असलेल्या मोफत लसीकरणाचा राज्य सरकारच्या अयोग्य नियोजनामुळे पुरता फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकार आपले अपयश झाकण्यासाठी सतत केंद्राकडे बोट दाखवत आहे. राज्य सरकारचा नाकर्तेपणा स्पष्टपणे दिसत असून, लस वाटपाचे नियोजन हे ठराविक भागास झुकते माप देण्याच्या राजकारणामुळे पुरते कोलमडले असल्याचा आरोप सुद्धा पवार यांनी केला आहे.

राज्यातील जनता लसीकरणापासून वंचित राहात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या असंख्य केंद्रांवर लसपुरवठ्याचा जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण केला जात आहे. त्याचा दोष हा केंद्र सरकारच्या माथी फोडला जात आहे. मात्र याचा फटका हा सर्वसामान्य जनतेस बसत बसत असल्याचं पवार म्हणाल्या.

Updated : 11 May 2021 2:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top