Home > News > 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?'; महिला अत्याचारांच्या घटनेवरून भाजप महिला मोर्चा आक्रमक

'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?'; महिला अत्याचारांच्या घटनेवरून भाजप महिला मोर्चा आक्रमक

कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?; महिला अत्याचारांच्या घटनेवरून भाजप महिला मोर्चा आक्रमक
X

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात सामुहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर ऑटोचालक आणि कुलींनी सामुहिक बलात्कार केल्याची संतापजनक प्रकार समोर आला आहे. यावरून भाजप महिला मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तर 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?,' असा खोचक टोलाही त्यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

उमा खापरे म्हणल्यात की," महाभकास आघाडी सरकारला जाग कधी येणार. शिवाजी महाराजांच्या नावाने जिंकून सत्तेत येणाऱ्या या सरकारला महाराष्ट्राच्या भगिनींची सुरक्षा महत्त्वाची वाटत नाही का? आज एका दिवसात तीन-तीन ठिकाणी अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना घडतात आणि मुख्यमंत्र्यांना त्याचा संताप कसा येत नाही?,असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तर, नागपूर मध्ये मुलीवर दोन वेळा सामूहिक बलात्कार, काकाने केलेला एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार आणि पालघर जिल्ह्याच्या डहाणू येथील मुलीवर अत्याचार या सगळ्या माध्यमातून समजलेल्या बातम्या पण त्यांचे काय ज्या बातम्या समोर येतं च नाही? पोलिसांकडून सुरक्षा सोडून वसूली करून घेणारे गृहखाते महिला सुरक्षा साठी आत्ता तरी पाऊले उचलणार का? असेही त्या यावेळी म्हणल्यात.


नागपुरात रेल्वेस्थानकावर आलेल्या पिडीत अल्पवयीन मुलीकडे पुरेसे पैसे नसल्याने ती रेल्वेने जाऊ शकली नाही. त्याच वेळी ऑॅटोचालक मोहंमद शहानवाज उर्फ साना वल्द मोहंमद रशीद याने तिला मदत करण्याच्या बहाण्याने त्याच्या खोलीवर नेले. तिथे अन्य एक ऑटोचालक मित्र मोहंमद तौसीफ वल्द मो. युसूफ व मोहंमद मुशीर याच्यासह आणखी एकाला बोलावून घेतले. या चौघांपैकी दोघांनी गुरूवारी रात्री तिच्यावर बलात्कार केला तर दोघांनी मेयो चौकातील मेट्रो उड्डाणपुलाखाली ऑॅटोत बलात्कार करून शुक्रवारी पहाटे तिला मेयो रूग्णालया जवळ सोडून दिले. या घटनेने खळबळ उडाली असून, घटनेनंतर पुन्हा एकदा नागपूर शहर चर्चेत आले आहे.

Updated : 3 Aug 2021 2:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top