Home > News > मी Corona Positive, पंकजा मुंडे यांचं ट्वीट

मी Corona Positive, पंकजा मुंडे यांचं ट्वीट

मी Corona Positive, पंकजा मुंडे यांचं ट्वीट
X

देशभरात करोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना करोनाची लागण झाली आहे. ही माहिती खुद्द पंकजा मुंडे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे.

काय म्हटलंय ट्वीटमध्ये? 'माझा करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून विलगीकरणात होते. गेल्या काही दिवसांपासून करोनामुळं मृत्यू झालेल्या कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यात वेळी कदाचित मला करोनाचा प्रादुर्भाव झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळं या काळात जे कोणी माझ्या संपर्कात जे आले आहेत त्यांनी स्वतःची करोना चाचणी करुन घ्यावी,' असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी खासदार प्रीतम मुंडे यांनाही करोनाची लक्षण दिसत असल्यामुळे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यांने घरीच औषधोपचार सुरु केला होता. यासंदर्भातली माहिती त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत दिली होती.

Updated : 29 April 2021 5:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top