Home > News > 'यंदाचा दसरा मेळावा वेगळ्या पध्दतीने' पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना सुचना

'यंदाचा दसरा मेळावा वेगळ्या पध्दतीने' पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना सुचना

यंदाचा दसरा मेळावा वेगळ्या पध्दतीने पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना सुचना
X

यंदा कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे पंकजा मुंडे यांनी वेगळ्या प्रकारे दसरा मेळावा साजरा करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. यंदाचा दसरा मेळावा हा ऑनलाइन असणार आहे, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. संत भगवान बाबा यांची जन्मभूमी सावरगावातील दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने भक्तांनी सावरगावत येऊ नये, अशी माहिती मुंडे यांनी दिली.


व्हिडीओच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भगवान गडावर न येण्याचे आवाहन केलं आहे. त्या म्हणाल्या की, "माझा मेळावा कसा होणार याच्याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मी कालच मराठवाड्याचा दौरा केला. तेव्हा मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. आपल्या दसऱ्या मेळाव्याला दरवर्षी लाखोंची गर्दी जमा होत असते. सावरगाव इथं लाखो कार्यकर्ते हे भगवानगडावर जमा होत असतात, त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे.


त्याचबरोबर, मी स्वत: भगवानगडावर जाऊन दर्शन घेणार आहे आणि तिथूनच फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह येऊन तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करणार आहे." असं पंकजा यांनी सांगीतलं आहे. दरम्यान, भगवान भक्तीगडावर 2014 पासून पंकजा मुंडे यांच्या मार्फत दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याला गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते.

Updated : 22 Oct 2020 8:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top