Home > News > पंकजा मुंडे यांच्या बॅनरवरून भाजपचे नेते गायब..

पंकजा मुंडे यांच्या बॅनरवरून भाजपचे नेते गायब..

पंकजा मुंडे यांच्या बॅनरवरून भाजपचे नेते गायब..
X

मागील अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे स्वपक्षातीलच नेत्यांवर नाराज असल्याची चर्चा होती. यात विधानपरिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना डावलल्याने मुंडे कार्यकर्त्यांनी आपली भाजपच्या नेत्यांवरील नाराजी उघड बोलून दाखवली. आता पंकजा मुंडे यांना राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिपद मिळावं यासाठी समर्थक अगदी देवाला साकडे घालण्याससुन सर्व काही करत आहेत. पंकजा मुंडे यांचे समर्थकांत स्वपक्षातीलच नेत्यांवर नाराज आहेतच एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकवेळा कार्यकर्त्यांनी निशाणा साधला आहे. आता तर पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवरून भपच्या नेत्यांचेच फोटो गायब झाले आहेत.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा उद्या वाढदिवस आहे. आणि याच वाढदिवसानिमित्त परळी शहरात पंकजा मुंडे यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स झळकत आहे. मात्र या बॅनरवर भाजपच्या नेत्यांचा फोटो नसल्याचं दिसत आहे. परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, टॉवर चौक या मुख्य चौकात हे बॅनर्स झळकत असून यावर पंकजा मुंडेंना शुभेच्छा देणा-या आशयाचे हे बॅनर दिसत आहेत. परंतु काही बॅनर वगळता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वगळला तर एकाही भाजपच्या नेत्याचा फोटो नाही. त्यामुळे सध्या याची चर्चा होते आहे.Updated : 25 July 2022 9:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top