Home > News > हर्षवर्धन पाटलांच्या मुलीचं लग्न ठरतंय सुपर स्प्रेडर, नवरीच कोरोना पॉझिटीव्ह निघाली!

हर्षवर्धन पाटलांच्या मुलीचं लग्न ठरतंय सुपर स्प्रेडर, नवरीच कोरोना पॉझिटीव्ह निघाली!

हर्षवर्धन पाटलांच्या मुलीचं लग्न ठरतंय सुपर स्प्रेडर, नवरीच कोरोना पॉझिटीव्ह निघाली!
X

भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची मुलगी अंकिता पाटील (Ankita Patil) यांचं आणि बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांचे नातू निहार ठाकरे (Nihar Thackeray) यांचं लग्न २८ डिसेंबरला मोठ्या धुमधडाक्यात पार पडलं. पण हेच लग्न आता कोरोना स्प्रेडर ठरत आहे. नववधू अंकीता पाटील स्वतः कोव्हिड पॉझिटीव्ह झाल्या आहेत. याची माहिती त्यांनी स्वत: ट्विटरवरून दिली आहे.

अंकिता पाटील आणि निहार ठाकरे यांचं लग्न 28 डिसेंबरला मंगळवारी पार पडलं. यानंतर दुसऱ्याच दिवशी अनेक नेत्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), हर्षवर्धन पाटील यांचा समावेश आहे. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार या लग्नसोहळ्याला उपस्थित होते.

अंकिता पाटील यांनी ट्विटरवर ट्विट करत आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं आहे. त्यांनी म्हमतात, आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व सर्वांनी आपली काळजी घ्यावी"

अंकिता पाटील यांचे पती निहार हे बिंधुमाधव ठाकरे यांचे पुत्र आहेत. या लग्नाला विद्यमान सरकारमधील अनेक मंत्री, भाजप नेते आणि स्वतः राज्यपाल यांनी उपस्थिती लावली होती.

Updated : 2 Jan 2022 10:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top