Home > News > चित्रा वाघ-चाकणकरांमध्ये शायरी अंदाजात निशाणेबाजी

चित्रा वाघ-चाकणकरांमध्ये शायरी अंदाजात निशाणेबाजी

चित्रा वाघ-चाकणकरांमध्ये शायरी अंदाजात निशाणेबाजी
X

मुंबई: काँग्रेस नेते आणि मंत्री विजय विडेट्टीवार यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या ऑनलॉकच्या घोषणेनंतर ते मोठ्याप्रमाणात ट्रोल झाले. त्यांच्या याच घोषणेवरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर पुन्हा एकदा समोरा-समोर आले आहेत.

विजय विडेट्टीवार यांची घोषणा फुसका बार ठरल्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करत,"सतरा कारभारी,एक नाही दरबारी" अशी खोचक टीका केली होती..चित्रा वाघ यांनी केलेल्या ट्विटला आता चाकणकर यांनी उत्तर दिले आहे. चाकणकर यांनी ट्विट करत,"ED, CBI ची धमकी भारी, कुंकू वाचवायला कमळीच्या दारी"असा टोला चित्रा वाघ यांना लगावला आहे.

विजय विडेट्टीवार यांनी 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णपणे मागे घेण्यात येत असल्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा अधिकृत नसल्याचं मुख्यमंत्री कार्यालयातून स्पष्ट करण्यात आल्यानंतर विजय विडेट्टीवार यांच्यावर मोठी टीका झाली. यावेळी विरोधकांनी यावरून ठाकरे सरकारवर मोठ्याप्रमाणात टीका सुद्धा केली.

Updated : 5 Jun 2021 1:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top