Home > News > #bikini : '' मग तुम्ही देखील बिकनी घाला'' प्रियंका गांधी यांच्यावर नेटकरी संतापले..

#bikini : '' मग तुम्ही देखील बिकनी घाला'' प्रियंका गांधी यांच्यावर नेटकरी संतापले..

#bikini :  मग तुम्ही देखील बिकनी घाला प्रियंका गांधी यांच्यावर नेटकरी संतापले..
X

कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब वादात नोबेल विजेती मलाला युसुफझाईनंतर Malala Yousafzai आता प्रियांका गांधी Priyanka Gandhi यांचे वक्तव्य आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये मतदानाच्या एक दिवस आधी प्रियांका गांधी यांनी ''महिलांना त्यांचा पोशाख ठरवण्याचा अधिकार घटनेत मिळाला आहे. त्यांनी याची पर्वा करू नये. ती तिला पाहिजे ते घालू शकते... मग ती बिकिनी (bikani) असो वा बुरखा (ghoonghat), जीन्स( jeans) किंवा हिजाब( hijab) असो..महिलांचा छळ करणे थांबवा. #ladkihoonladsaktihoon असं ट्विट प्रियांका गांधी यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विट ला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील हाताचा अंगठा दाखवणारे ईमोजी वापरून समर्थन दर्शवले आहे.
प्रियंका गांधी यांच्या या वक्तव्यामुळे समाज माध्यमांवर आता अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. प्रियंका गांधी यांच्या ट्विट नंतर सध्या ट्विटरवर बिकनी ट्रेंड मध्ये आहे. जवळपास 43 हजारांहून अधिक लोकांनी #Bikini वापरून ट्विट केले आहे.
आता नेटकर्यांनी प्रियांका गांधी यांच्या या वक्तव्यावर जोरदार मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर समाज माध्यमांवर अनेक मिम्स सुद्धा बनवले जात आहेत. तर अनेक लोकांनी याविषयी त्याचे मत व्यक्त केलं आहे.

Oxygen नावाच्या एका युजने प्रियंका गांधी जर भविष्यात पंतप्रधान झाल्या तर शाळांध्ये अशी परिस्थिती असेल असं म्हणत हा फोटो शेअर केला आहे.
तर कोमल शर्मा या ट्विटर वापरकर्त्याने शाळेच्या गणवेशाऐवजी बुरखा घालण्याचे समर्थन केल्यास बिकिनी घालण्याची मागणी होईल असं म्हणत त्यांनी शाळेचा युनिफॉर्म हा समानतेचे प्रतीक असल्याचं म्हंटल आहे.
गोपाल केसरिया या ट्विटर वापरकर्त्याने प्रियंका गांधी यांच्या ट्विटला रिट्विट करत म्हटलं आहे की जर बिकनी घालून शाळेत जाणं योग्य आहे तर नागा लोक शाळेत कसे जातील? #Uniform_Civil_code

निकेत राज यांनी प्रियंका गांधी यांना उत्तर देताना म्हटले आहे की, तुम्ही देखील बिकनी घाला, यूपीमध्ये काँग्रेसला सरकार मिळण्याचा हा एकमेव मार्ग आहे.तर रिचा अनिरुद्ध यांनी प्रियंका गांधी यांच्या ट्विट ला उत्तर देताना म्हंटल आहे की, ''प्रियंका जी अशी एक मुलगी सांगा की जी बिकिनी घालून कॉलेजला जाते , कृपया जे सत्य आहे त्याबद्दल बोला, विषय शाळेतील गणवेशाचा आहे बाकी काही नाही. भारतीय महिलांनी प्रतिगामी पर्दा व्यवस्थेपासून मुक्त होण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. तुम्हाला ते परत हवे आहे आणि भारताला इराण बनवायचे आहे

Updated : 2022-02-09T13:57:20+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top