Home > News > भूमी पेडणेकरच्या मावशीला व्हेंटिलेटरची आवश्यकता; ट्विटरवरून मागितली मदत

भूमी पेडणेकरच्या मावशीला व्हेंटिलेटरची आवश्यकता; ट्विटरवरून मागितली मदत

सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आता बॉलीवूड स्टार सुद्धा मदत मागताना पाहायला मिळत आहे.

भूमी पेडणेकरच्या मावशीला व्हेंटिलेटरची आवश्यकता; ट्विटरवरून मागितली मदत
X

मुंबई: देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्याप्रमाणात वाढत असून लोकांना बेड, ऑक्सिजन आणि वेंटिलेटर मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशावेळी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आता बॉलीवूड स्टार सुद्धा मदत मागताना पाहायला मिळत आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकरने सुद्धा ट्विटरवरून अशीच आपल्या नातेवाईकांसाठी मदत मागितली आहे.

भूमी पेडणेकरने ट्विट करत म्हंटल आहे कि, "हे दिवस अजूनच अडचणीचे होत आहे.मला माझ्या मावशीसाठी दिल्लीतील एनसीआर मध्ये व्हेंटिलेटर ची गरज आहे. त्या सद्या आईसीयूमध्ये असून, त्यांना तात्काळ हलवण्याची गरज आहे.याबाबत कुणालाही माहिती असेल तर मला मॅसेज करा,असं ट्विट भूमी ने केलं.

बरेच जण सोशल मीडिया वरून मदत मागत आहे आणि त्याला प्रतिसाद देत अनेकजण मदत ही करत आहे.त्याचप्रमाणे भूमीने ट्विट केल्यानंतर अनेकांनी तिच्या पोस्टला उत्तर देत,महत्वाची माहिती दिली.त्यानंतर भूमीने ट्विट करत माहिती दिली की,माझ्या मावशीला मदत मिळाली आहे. यावेळी तिने ट्विटर वापरकर्त्यांचे आभार सुद्धा मानले.

Updated : 2021-05-03T21:00:56+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top