Home > News > शिर्डीतील 'त्या' बोर्डाला तृप्ती देसाईनी गनीमी काव्यानं फासलं काळं...

शिर्डीतील 'त्या' बोर्डाला तृप्ती देसाईनी गनीमी काव्यानं फासलं काळं...

शिर्डीतील त्या बोर्डाला तृप्ती देसाईनी गनीमी काव्यानं फासलं काळं...
X

शिर्डीच्या साई बाबा मंदिर संस्थानाने भक्तांनी मंदिरात दर्शनासाठी येताना भारतीय वेशभूषेत यावे असा बोर्ड लावून त्याची अंमलबजावणी केली आहे. अशा प्रकारचा बोर्ड लावून भक्तांच्या वेशभूषेवर निर्बंध घालणे योग्य नाही, तसेच भारतीय संविधानाच्या दृष्टीकोनातून भक्तांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रयत्न आहे. असं म्हणत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शिर्डीच्या साई बाबा मंदिर संस्थान विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.

तृप्ती देसाई यांनी साई बाबा मंदिर संस्थानला ३१ डिसेंबर पर्यंत हा बोर्ड काढण्याचा इशारा दिला होता. पण मंदिर संस्थानने त्याची दखल घेतली नाही. तसेच मंदिर संस्थानच्या विरोधात आंदोलनासाठी निघालेल्या तृप्ती देसाई यांना अटक करून शिर्डी बाहेर सोडत शिर्डीत येण्यास बंदी घातली होती. तृप्ती देसाई यांना जरी शिर्डीत येण्यास बंदी असली तरी त्यांचे कार्यकर्ते कधीही येवून तो बोर्ड काढतील या भितीने मंदीर संस्थानने तो बोर्ड उंचावर लावला होता.

शिर्डी साई बाबा मंदिर संस्थानंच्या आडमुठेपणाला वैतागून अखेर भूमाता ब्रिगेडच्या काही पदाधिकाऱ्यांनी गुरूवार ७ जानेवारीला संध्याकाळी सव्वापाच च्या सुमारास या बोर्डाला काळं फासलं आहे. भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि साईबाबांच्या भक्त असलेल्या मनिषा कुंजीर, मीनाक्षी शिंदे आणि हर्षल पाटील यांनी या बोर्डाला काळे फासले आणि साई संस्थानची दादागिरी मोडीत काढली.

भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गनिमाचा वापर करून केलेल्या या कामगीरीवर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी या सर्व कार्यकर्त्यांना सलाम करून त्यांचे अभिनंदन केले आहे. भूमाता ब्रिगेडने केलेल्या या आंदोलनानंतर शिर्डी साई बाबा मंदिर संस्थान आता तरी आपला निर्णय मागे घेईल का हे पाहवं लागणार आहे. तसेच जर मंदिर संस्थानने जर निर्णय मागे घेतला नाही, तर भूमाता ब्रिगेड या पुढे कोणतं पाऊन उचलेल हे ही पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Updated : 7 Jan 2021 2:48 PM GMT
Next Story
Share it
Top