Home > News > भावना गवळी शिंदे गटात जाणार?

भावना गवळी शिंदे गटात जाणार?

भावना गवळी शिंदे गटात जाणार?
X

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आज झालेल्या शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या नाहीत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर काही खासदार देखील शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये भावना गवळी यांचे नाव सर्वात पुढे आहे. कारण मागच्या काही दिवसांपूर्वी भावना गवळी यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहीत नैसर्गिक युती म्हणून भाजपसोबत जाण्याची मागणी केली होती. त्यानंतर भावना गवळी देखील शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. या सगळ्या प्राकारानंतर शिवसेनेनं लोकसभेतील प्रतोद पदावरून देखील त्यांची हकालपट्टी करत राजन विचारे यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली. या सगळ्या पार्श्ववभूमीवर आज शिवसेनेप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी सर्व खासदारांची बैठक घेतली. हि बैठक संसदेचे येऊ घातलेले अधिवेशन व राष्ट्रपती पदाच्या निवडणुकी संदर्भात बोलवली असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र या बैठकीत आमदारांपाठोपाठ खासदार देखील बंड करणार असल्याच्या चर्चेवर देखील बोलणं झालं असल्याचं म्हंटल जात आहे.

भावना गवळी यांच्यावर ED चा दबाव असल्याची टीका होत आहे. नक्की भावना गवळीचे हे प्रकरण आहे तरी काय?

सप्टेंबर महिन्यात 'ईडी'ने भावना गवळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते. या प्रकरणात ईडीनं सईद खान या व्यक्तीला अटक केली होती. सईद खान हे खासदार गवळी यांच्या ट्रस्टमध्ये संचालक आहेत. या ट्रस्टला बेकायदेशीररित्या कंपनीमध्ये रुपांतरित करण्यासाठी सईद खान यांनी मध्यस्थी केली. त्यासाठीच धर्मदाय आयुक्त कार्यालयातही गैरयव्यवहार झाला. एकूण गैरव्यवहार १८ कोटींचा आहे. यात सात कोटी रुपयांच्या रोख रकमेचाही गैरवापर करण्यात आल्याचं म्हणत ED ने त्यांची चौकशी केली होती. त्यासंबंधी अधिक चौकशीसाठीच गवळी यांना तीनवेळा समन्स बजावण्यात आले होते.

ईडीच्या या कारवाईवर गवळी म्हणाल्या होत्या की, भाजपनं जुलमी सत्र सुरू केलं आहे. माझी आणि माझ्या संस्थांची काय चौकशी करायची ती करा. पण शिवसेना हा अन्यायाविरुद्ध लढणारा पक्ष आहे. आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही, माझी चौकशी करताय तर वाशिम जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांची पण चौकशी करा अशी त्यांनी मागणी केली होती.

शिवसेनेच्या आजच्या मातोश्रीवरील बैठकीला एकूण 19 लोकसभा खासदारांपैकी 12 खासदार बैठकीला उपस्थित तर 7 खासदार अनुपस्थित.

कोण कोण खासदार बैठकीला उपस्थित होते

1. गजानन कीर्तिकर

2. अरविंद सावंत

3. विनायक राऊत

4. हेमंत गोडसे

5. धैर्यशील माने

6. प्रताप जाधव

7. सदाशिव लोखंडे

8. राहुल शेवाळे

9. श्रीरंग बारणे

10. राजन विचारे

11. ओमराजे निंबाळकर

12. राजेंद्र गावीत

कोण कोण खासदार बैठकीला अनुपस्थित होते...

1. यवतमाळ-वाशिम - भावना गवळी

2. परभणी - संजय जाधव

3. कोल्हापूर - संजय मंडलिक

4. हिंगोली - हेमंत पाटील

5. कल्याण-डोंबिवली - श्रीकांत शिंदे

6. रामटेक - कृपाल तुमाने

7. दादरा-नगर हवेली - कलाबेन डेलकर

राज्यसभा खासदार

1. संजय राऊत

2. प्रियंका चतुर्वेदी

3. अनिल देसाई (दिल्लीला आहेत)

Updated : 11 July 2022 2:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top