Home > News > मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात भास्कर जाधवांची अरेरावी; महिलेवरही हात उगारला

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात भास्कर जाधवांची अरेरावी; महिलेवरही हात उगारला

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात भास्कर जाधवांची अरेरावी; महिलेवरही हात उगारला
X

राज्यात काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथील नागरिकांवर संकटाचा डोंगर कोसळला आहे, अशावेळी या लोकांना धीर देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी चिपळूण आणि खेड मधील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. मात्र मुख्यमंत्र्यांसोबत असलेले विधानसभा तालिका अध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव यांच्या आरेरावीमुळे लोकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री यांनी चिपळूण बाजारपेठेतील रस्त्यावर उतरून पाहणी केली. यावेळी एका महिलेनं मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडत आपल्या व्यथा मांडल्या, मुख्यमंत्र्यांनीही महिलेचं म्हणणं ऐकून धीर देण्याचा प्रयत्न केला.मात्र नेमकं त्याचवेळी भास्कर जाधव यांनी महिलेला "आमदार खासदारांनी सहा महिन्याचा पगार दिला तरी काय होणार नाय, तुझा मुलगा कुठंय??? तुझ्या आईला समजव" अशी प्रतिक्रिया दिली.

तर याच दौऱ्यात त्यांनी व्यथा मांडणाऱ्या एका महिलेवर हात उगरल्याचा व्हिडीओ सुद्धा सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहे.

Updated : 26 July 2021 3:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top