Home > News > आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ गेल अ‍ॅम्व्हेट यांचं निधन

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ गेल अ‍ॅम्व्हेट यांचं निधन

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ गेल अ‍ॅम्व्हेट यांचं निधन
X

अमेरिकेत जन्म झाल्यानंतरही साता समुद्रापार भारतात येथील सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या ऑम्व्हेट यांचे आज निधन झाले आहे. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 81 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालंय.

गेल यांचा जन्म ऑगस्ट १९४१ रोजी अमेरिकेतील मिनियापॉलिस येथे झाला. त्यांचे शिक्षण अमेरिकेतच पूर्ण झाले. १९७३ मध्ये त्यांनी समाजशास्त्र या विषयात पी.एच.डी केली होती. १९८३ पासून गेल या भारतीय नागरीक होत्या. त्यांची या लढ्यावर असंख्य पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. गेल ऑम्वेट यांच्या लिखाणात वर्ग, जात आणि लिंग समस्यांवर असंख्य पुस्तके आणि लेख समाविष्ट आहेत. अनेक संशोधन प्रकल्प हाती घेण्याव्यतिरिक्त, डॉ. गेल ऑम्वेट ह्या FAO, UNDP आणि NOVIB च्या सल्लागारही आहेत. आणि त्यांनी ओरिसातील NISWASS मध्ये डॉ आंबेडकर चेअर प्रोफेसर, पुणे विद्यापीठातील समाजशास्त्राचे प्राध्यापक आणि नॉर्डिक येथे आशियाई अतिथी प्राध्यापक म्हणून काम केलेले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ एशियन स्टडीज, कोपेनहेगन तसेच त्या नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीच्या वरिष्ठ सहकारी होत्या आणि क्रांतिवीर ट्रस्टच्या संशोधन संचालकही आहेत. तसेच त्या इतर अनेक संस्थांसाठी पर्यायी विकास निती, पर्यावरण आणि ग्रामीण विकास या विषयांवर सल्लागार समाजशास्त्रज्ञ म्हणून काम करत आहे.

डॉ भारत पाटणकर आणि गेल यांची प्रेम कहाणी आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरलेली होती. डॉ भारत पाटणकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्या सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे वास्तव्यास होत्या. भारतीय मातीत संशोधनासाठी आलेल्या गेल ओमव्हेट या याच मातीशी एकरूप झाल्या. येथील स्त्री चळवळ, जातिअंताची चळवळ, प्रकल्पग्रस्त चळवळ, पर्यायी विकास निती यासह विविध चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन नेतृत्व केले. सांगली जिल्ह्यातील येरळा नदीतील लाँग मार्च मध्ये त्या चालत सहभागी झाल्या होत्या. समान पाणी वाटप चळवळीत त्यांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन आपले योगदान दिले आहे.विधवा आणि परितक्त्या महिला चळवळीतील सांगली आणि सातारा जिल्ह्यातील त्यांचं काम उल्लेखनीय अस आहे. गेल ऑम्वेट यांना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्य आणि संशोधनामुळे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

गेल ऑम्वेट यांची खालीलप्रमाणे पुस्तके इंग्रजी, हिंदी, मराठी आणि मल्याळम भाषेत प्रकाशित झालेली आहेत.

English Books - with publish year

1. Understanding Caste - 2011

2. Ambedkar : Towards an Enlightened India - 2004

3. Patriarchy - 1986

4. Seeking Begumpura : The Social vision of Anti Caste intellectuals - 2008

5. Dalits and the Democratic Revolution : Dr. Ambedkar and the dalit movement in colonial - 1994

6. Dalit Visions - 1995

7. Buddhism in india : challenging Brahmanis and caste - 2003

8.Building the Ambedkar Revolution : Sambhaji Tukaram Gaikwad and kokan dalits - 2011

9. Cultural Revolt in a colonial society : The non bramhan movement in western india. - 1976

10. Seeking Begumpura - 2008

11. We will smash this prison - Indian women in struggle - 1980

12. Reinventing Revolution : Now social movement and the socialist tradition in india - 1993

13. Dalit Visions : Anti Caste movement & the construction of an Indian Identity - 2006

14. Land, Caste & politics in Indian state - 1982

15. Dalit Visions 2 /E (second edition) - 2011

16. Jotirao phule and the ideology of social revolution in India - 2004

17. Violence against women : New movements and new theories in India - 1990

18. Dalit and the Democratic Revolution Dr. Ambedkar and the Dalit Movement - 1994

19. Buddhism in India : Challenging Brahmanis and caste - 2003

20. Social justice philanthropy - 2009

21. The Songs of Tukuba - 2012

22. The Dalit Liberation movement in the colonial period - 2004

23. Gender and Technology : Emerging visions from Asia - 1995

Hindi Books - with publish year

1. आंबेडकर - 2005

2. दलित दृष्टी - 2014

3. दलित और प्रजातांत्रिक क्रांती - 2009

4. जाती की समझ : महात्मा बुद्ध से डॉ. बाबासाहेब आंबेडकर और उसके बाद - 2018

5. आंबेडकर : प्रबुद्ध भारत की और - 2006

Marathi Books - with publish year

1.भारतातील बौद्धधम्म - 2016

2. आंबेडकर प्रबुद्ध भारताच्या दिशेने - 2021

Malayalm Books - with publish year

Indian Buddhism

Updated : 25 Aug 2021 4:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top