बीड जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून सायंकाळ पासून सुरू असलेल्या पावसाने अक्षरशः थैमान घातल आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रकल्प शंभर टक्के भरले असून नदी नाले ओसंडून वाहू लागलेत. अतिवृष्टीने शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. केज तालुक्यातील बनकरंजा येथील शेतकऱ्यांना वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. खरिपाचे उरले सुरलेलं पिकं मातीमोल झाले आहे.
Updated : 28 Sep 2021 8:44 AM GMT
Next Story