Home > News > संतापजनक! दारूड्या मुलाचा आईवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

संतापजनक! दारूड्या मुलाचा आईवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

संतापजनक! दारूड्या मुलाचा आईवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
X

आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना बुलडाणा जिल्ह्यातील शेगावात उघडकीस आली आहे. सवयीने दारुडा असलेल्या 22 वर्षीय मुलाने चक्क आपल्या 45 वर्षीय आईवरच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची किळसवाणी घटना घडली समोर आली आहे. तर यासंदर्भात कुणाला काही सांगितल्यास जीवे मारून टाकेल, अशी धमकी देत आरोपीने पिडीतीला मारहाण केली आहे. मात्र आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडीत पीडित महिलेने याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून नराधम मुलाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत, आणि त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेगाव शहरातील जोगडी फैल परिसरात 45 वर्षीय पीडित महिला तिच्या मुलीसह राहते. सदर महिलेला पहिल्या पतीपासून असलेला आरोपी 22 वर्षीय मुलगा आहे. या मुलाला दारूचे व्यसन असून 1 ऑक्टोंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजे दरम्यान आरोपीने स्वतःची आई असलेल्या पीडितेवर अती प्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

तर विरोध करणाऱ्या आईच्या अंगावर अनेक ठिकाणी चावा घेत रबरी पाईपने मारहाण केली. तसेच जीवाने मारून टाकण्याची धमकी दिली अशी तक्रार पीडित महिलेने शहर पोलीस स्टेशनला दिली. यावरून शहर पोलीस स्टेशन मध्ये नराधम मुला विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

Updated : 4 Oct 2021 9:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top