Latest News
Home > News > अन्यथा राज्यात अधिक कडक निर्बंध लावावे लागू शकतील - मुख्यमंत्र्यांचे निर्देश

अन्यथा राज्यात अधिक कडक निर्बंध लावावे लागू शकतील - मुख्यमंत्र्यांचे निर्देश

अन्यथा राज्यात अधिक कडक निर्बंध लावावे लागू शकतील - मुख्यमंत्र्यांचे निर्देश
X

ओमिक्रॉन व्हेरियंटच्या (Omicron variant) पार्श्वभुमीवर देशात कोरोनाचा विस्फोट झाला असल्याचे चित्र आहे. तर कोरोनाचा वाढता आलेख कमी होताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. तर गेल्या 24 तासात 2 लाख 47 हजार 417 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशाची धाकधूक वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यातच गेल्या 24 तासात 2 लाख 47 हजार 417 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ही रुग्णसंख्या बुधवारच्या तुलनेत तब्बल 28 टक्के इतकी आहे. यासह देशातील रुग्णदरवाढीचा दर 13.11 टक्क्यांवर पोहचला आहे.

ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या रुग्णसंख्येतही मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात 5 हजार 488 नव्या ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. याबरोबरच बुधवारच्या तुलनेत गुरूवारी ओमायक्रॉनचे 620 रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात कोरोनामुक्त झालेली रुग्णसंख्या 84 हजार 825 इतकी आहे. बुधवारच्या तुलनेत गुरूवारी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही 24 हजार 420 इतकी वाढली आहे. याबरोबरच देशात (Covid-19 case in india) उपचार घेत असलेली रुग्णसंख्या 11 लाख 17 हजार 531 इतकी आहे.

याबरोबरच महाराष्ट्रात 24 तासात 46 हजार 723 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर 33 रुग्णांचा मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच सध्या राज्यातील मृत्यूदर 2.1 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे राज्याचे टेन्शन वाढले आहेत.

गेल्या 24 तासात राज्यात ओमायक्रॉनचे 86 नवे रुग्ण आढळले. आतापर्यंत राज्यात 1 हजार 376 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 734 रुग्णांना आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर

घरी सोडण्यात आले आहे.

कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभुमीवर गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. त्यामुळे गुरूवारच्या बैठकीकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Updated : 13 Jan 2022 4:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top