Home > News > टोल नाक्यावरील महिलांच्या वॅाशरुमची स्थिती एकदा बघाच..

टोल नाक्यावरील महिलांच्या वॅाशरुमची स्थिती एकदा बघाच..

टोल नाक्यावरील महिलांच्या वॅाशरुमची स्थिती एकदा बघाच..
X

महिलांना प्रवासात अनेक समस्या येतात आपल्याला माहित आहे, आपल्या घरात आपण पाहतो आपण कुठे बाहेर जाणार असू तर आपल्या घरातील महिला पाणी सुद्धा पीत नाहीत.. आता याच कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसणार आहे.. होय महिलांना रस्त्यात नीट वॉशरूम मिळत नाही म्हणून त्या हे सर्व करतात. अरे आता आपण इतक्या विकासाच्या गप्पा मारतो, आपलं सरकार नाही तिथे हजारो कोटी रुपये खर्च करते पण याविषयी त्यांना काहीच करावं वाटत नाही का? इतका पैसे खर्च करून हे चकचकीत महामार्ग बनवले जातात मात्र तिथे साधी महिलांना वॉशरूमची सुविधा नसावी. आता यावर काही लोक म्हणतील देखील की रस्त्यावर अनेक ठिकाणी वॉशरूम आहेत.. तर जिथे असे वॉशरूम आहेत तिथे तुम्ही एकदा जा आणि भेट देऊन या मग समजेल की ते कोणत्या अवस्थेत आहेत.. ना तिथे पाण्याची सिविधा असते, ना लाइटची सिविधा हे सगळं असलं तर त्या सौचालयांची स्थिती पाहता तिथे फक्त भटकी जनावरे राहू शकतात अशी सगळी स्थिती असते.. होय आता विचार करण्याची गरज आहे. या सरकारला सगळया महिलांनी जाब विचारण्याची गरज आहे.. इतका मोठा टोल घेतला जातो पण त्या टोल नाक्यावर देखील या सगळ्या सुविधांचा वनवा असतो.. मग अशा मानसिकतेच्या लोकांना आता जाब विचरण्याची गरज आहे.. आता हा आवाज MaxWoman उठवणार आहे गरज आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्याची...

काल एका मुलीने एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. आता हा व्हिडिओ काय आहे हे आम्ही तुम्हाला दाखवूच पण त्या आधी हा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या घरातील आई-बहिणीला प्रवासाला पाठवू शकता का? याचा थोडा विचार करा.. तर झालं असं होतं की, अनिकेत या एक प्रसिद्ध यूटुबर आहेत. त्या रात्री प्रवासाला बाहेर पडल्या होत्या. त्या बस मधून प्रवास करत होत्या त्यांनी बसच्या ड्रायव्हरला साधारण ११:१५ च्या सुमारास त्यांना वॉशरूमला जाण्यासाठी कुठेतरी बस थांबवण्यास सांगितले. त्यानंतर त्या बस ड्रायव्हरने साधारण १२ वाजता एका ठिकाणी गाडी थांबवली पण त्या ठिकाणी त्याने महिलांसाठी काही सुविधा नसल्याचं सांगितले. त्यानंतर कोल्हापूरच्या अलीकडे असलेल्या किणी टोलनाक्यावर गाडी पावणे दोन वाजता थांबली, पण त्या ठिकाणी असलेल्या वॉशरूमची अस्वस्थ अत्यंत भयानक होती. त्या वॉशरूमचे दरवाजे नीट लागत नव्हते, अनेक दरवाजे तर पूर्ण तुटून गेले होते. आता हे वॉशरूम कसे होते हे तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलात तर तुमची तळपायाची आग मस्तकात जाईल. तर एकंदरीत हा सर्व प्रकार अत्यंत धक्कादायक आहे..

जरा विचार करा त्या मुलीला ११ वाजता वॉशरूमला जायचे होते. ११ ते २ जवळपास तीन तास त्या मुलीवर काय बेतली असेल विचार केला आहे का? आता हा सर्व प्रकार पाहिल्यावर नक्कीच टिळकांचे ते शब्द आठवतात '' या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?'' होय इतक्या मोठ्या प्रमाणावर जनतेचे पैसे खर्च करून हे महामार्ग बनवले जातात, या रस्त्यांच्या डागडुजीसाठी, सोई सुविधा पुरवण्यासाठी भरमसाठ टोल घेतले जातात? मग हे पैसे जातात कुठे? आज या मुलीने धैर्याने हा व्हिडिओ केला म्हणून आपल्या सर्वांच्या समोर ही भयानक गोष्ट आली पण आपल्या सर्वांच्याच घरात असलेल्या आय-भहिनीना या समस्सेल समोर जावं लागत..

तर आता महिलांनी पुढे येण्याची गरज आहे, मैत्रिणींनो तुम्ही कुठे प्रवास करत असाल आणि तुम्हाला अशा प्रकारच्या काही समस्या आल्या किंवा रस्त्याकडेला असेलल्या वॉशरूमची दुरावस्था झाली असेल तर त्याचे व्हिडिओ तुम्ही आम्हाला पाठवा आम्ही राज्यकर्त्यांना याबाबत नक्की जाब विचारू..

Updated : 2 Jan 2023 8:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top