Home > News > वडिलांवर टीका करणाऱ्या पडळकरांचा थोरांताच्या लेकीनं घेतला समाचार

वडिलांवर टीका करणाऱ्या पडळकरांचा थोरांताच्या लेकीनं घेतला समाचार

वडिलांवर टीका करणाऱ्या पडळकरांचा थोरांताच्या लेकीनं घेतला समाचार
X

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याच म्हंटल्यानंतर, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी थोरातांवर टीका केली होती. मात्र वडिलांवर टीका करताना पडळकरांनी वापरलेली भाषा न रुचल्याने थोरात यांची कन्या शरयू देशमुख यांनी पडळकरांचा ट्विट करत समाचार घेतला आहे. "महसूलमंत्रीपदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा प्यायल्याप्रमाणे बरळू लागले आहेत. मूळात देवेंद्र फडणवीस यांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षा अगोदरच झाले आहे, याचेही भान यांना राहिले नाही," असं ट्विट करत गोपीचंद पडळकर यांनी थोरातांवर निशाणा साधला होता.वडीलांवर झालेल्या टीकेला प्रत्यु्त्तर देताना शरयू देशमुख यांनी पडळकरांना संस्कार शिकवले. पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होत. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती. असो, ज्याचे त्याचे संस्कार..!, असे ट्विट शरयू यांनी केलं आहे.काय म्हणाले होते थोरात?

सत्तेसाठी काहीही बोलायचे, नंतर कृती करायची नाही, ही भाजपची सवय पहिल्यापासूनचा आहे. फडणवीस यांनी आतापर्यंत अनेक घोषणा केल्या, पण पुढे त्याचं काहीच झालं नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी टीका थोरात यांनी केली होती.

Updated : 29 Jun 2021 1:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top