Home > News > बजरंगी भाईजांमधील मुन्नीने पदर डोक्यावर घेऊन केला व्हिडिओ शेअर; चाहते म्हणाले....

बजरंगी भाईजांमधील मुन्नीने पदर डोक्यावर घेऊन केला व्हिडिओ शेअर; चाहते म्हणाले....

बजरंगी भाईजांमधील मुन्नीने पदर डोक्यावर घेऊन केला व्हिडिओ शेअर; चाहते म्हणाले....
X

सलमान खानच्या बजरंगी भाईजान चित्रपटात मुन्नीची भूमिका साकारणारी हर्षाली मल्होत्रा ​​अर्थातच चित्रपटांमध्ये पुन्हा दिसली नाही. पण ती आजही सोशल मीडियावर चाहत्यांशी जोडलेली आहे. ती सतत तिचे डान्स आणि संवादाचे व्हिडिओ शेअर करत असते. मुन्नीच्या या व्हिडिओंवर तिला चाहत्यांकडून खूप प्रेमही मिळते. अशातच हर्षाली मल्होत्राने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात ती पंजाबी संवाद बोलत आहे. या व्हिडिओमध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे आणि डोक्यावर पल्लू देखील ठेवला आहे. यामध्ये मुन्नी व्हिडिओमध्ये बोलते, 'मैं तैनु फिर मिलंगी …'

हर्षाली मल्होत्राच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. हर्षालीच्या या व्हिडिओवर तिचे चाहते तिचं कौतुकही करत आहेत. 13 वर्षीय हर्षालीने 2015 मध्ये कबीर खानच्या 'बजरंगी भाईजान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात सलमान खान आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत होते. विशेष म्हणजे ती टीव्ही मालिकांमध्ये देखील दिसली आहे. हर्षाली मल्होत्रा ​​'कुबूल है (2014)', 'लौट आओ त्रिशा (2014)' आणि 'सावधान इंडिया' या मालिकांमध्ये दिसली आहे. एवढेच नाही तर हर्षाली मल्होत्रा ​​अनेक पाकिस्तानी जाहिरातींमध्येही दिसली आहे.

Updated : 13 Oct 2021 8:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top