Home > News > बबीता फोगट तुम्ही बदाम खाऊनही बालीश विधानं करत असाल तर अवघड आहे

बबीता फोगट तुम्ही बदाम खाऊनही बालीश विधानं करत असाल तर अवघड आहे

बबीता फोगट तुम्ही बदाम खाऊनही बालीश विधानं करत असाल तर अवघड आहे
X

भारतीय कुस्ती खेळाडू बबीता फोगट यांनी राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून एखाद्या खेळाडूचे नाव द्यावे अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीवर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी टीका केली असून. ‘कुस्तीपटू असल्याने बदाम-खारकाचा शरीरासोबत बुद्धीला देखील चालना देणारा खुराक चालू असून देखील त्या या प्रकारची बालिश विधानं करत असतील तर मग अवघड आहे.’ असं चाकणकर यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/ChakankarSpeaks/status/1301798194569908224

दरम्यान, भारतीय कुस्ती खेळाडू बबीता फोगट यांनी राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून एखाद्या खेळाडूचे नाव द्यावे अशी मागणी केली. बबीता यांनी ट्वीटर द्वारे ही मागणी केली असून यात त्यांनी “खेळांसमंधीत पुरस्कार हे कोणत्याही राजकीय नेत्याच्या नावावरुन नाही तर एखाद्या महान खेळाडूच्याच नावाने देण्यात यावेत. ‘राजीव गांधी खेल रत्न’ पुरस्काराचे नाव बदलण्यात यावे.” अशी मागणी केली आहे.

https://twitter.com/BabitaPhogat/status/1301052130518728704

Updated : 4 Sep 2020 10:36 AM GMT
Next Story
Share it
Top