Home > News > शेवटच्या क्षणी व्हिसा मिळाला आणि तिने भारतासाठी जिंकले सुवर्णपदक..

शेवटच्या क्षणी व्हिसा मिळाला आणि तिने भारतासाठी जिंकले सुवर्णपदक..

शेवटच्या क्षणी व्हिसा मिळाला आणि तिने भारतासाठी जिंकले सुवर्णपदक..
X

आपल्या भारतीय खेळाडूंमध्ये टॅलेंटची अजिबात कमतरता नाही, त्यांना संधी मिळाली तर ते जग जिंकू शकतात. आणि हेच सिद्ध करून दाखवलं आहे नेमबाज अवनी लखेरा हिने. स्पर्धेच्या 3 दिवसांपूर्वी ती व्हिसासाठी दिल्लीच्या रस्त्यांवर इकडे तिकडे भटकत होता. आता फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅराशूटिंग विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तिला व्हिसा हवा होता तो मिळण्यास अडचण येत असल्यामुळे तिला अनेक ठिकाणी फेरफटके मारावे लागले आणि शेवटी व्हिसा मिळाला व ती स्पर्धेला पोहोचली. नुसती पोहोचलीच नाही तर तिने या स्पर्धेत सुवर्णपदक सुद्धा जिंकले.

बुधवारी सकाळी अवनी लखेरा आणि श्रीहर्ष देवा रेड्डी या जोडीने R-4 मिश्रित 10 मीटर रायफल SH2 मध्ये 253.1 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. अवनीचे हे दुसरे सुवर्ण आहे. अवनीने (250.6) मंगळवारी 10 मी. एअर रायफल स्पर्धेत विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले. या सुवर्णासह अवनी-श्रीहर्ष जोडीने 2024 मध्ये होणाऱ्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत स्थान निश्चित केले.

तीन दिवसांपूर्वी अवनी तिची आई श्वेता जेवरिया आणि प्रशिक्षक राकेश मनपत हे दिल्लीमध्ये व्हिसा क्लिअरन्ससाठी भटकत होते. एवढेच नाही तर 21 वर्षीय अवनीने क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे व्हिसा मंजूर करण्याची विनंतीही केली होती. आणि क्रीडा मंत्रालयाच्या प्रयत्नाने जेव्हा तिला फ्रान्सला जाण्याची संधी मिळाली तेव्हा या मुलीनेही आपल्या कामगिरीत कोणतीही कसर सोडली नाही आणि देशासाठी सुवर्णपदक जिंकले.

सुवर्णपदक घरी आणताना अभिमान वाटतो व्यक्त केल्या भावना..

अवनीने एक पोस्ट करत लिहिले आहे की, 'R2 10m Air Rifle SH1 इव्हेंट ज्यात Chateaux 2022 मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड स्कोअर आहे आणि मी भारताचा पहिला पॅरिस-2024 कोटा आहे. सुवर्णपदक घरी आणताना अभिमान वाटतो, मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार!'

ती आता 9 जून रोजी 10 मीटर प्रोन, 11 जून रोजी 50 मीटर थ्री पोझिशन आणि 12 जून रोजी 50 मीटर अंतिम फेरीत देखील सहभागी होणार आहे. त्यानंतर ती 13 जूनला दिल्लीला परतणार आहे.

Updated : 9 Jun 2022 8:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top