Home > News > क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचे कार अपघातात निधन

क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचे कार अपघातात निधन

क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचे कार अपघातात निधन
X

क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स यांचे निधन झाले. शनिवारी रात्री टाऊन्सविले येथे कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला. शहराच्या बाहेर सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये त्याची गाडी उलटली. अँड्र्यू सायमंड्स या कारमध्ये होते.
अँड्र्यू सायमंड्सच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. अँड्र्यू सायमंड्सची ऑस्ट्रेलियाचा एक धडाकेबाज क्रिकेटर अशी ओळख होती. ऑस्ट्रेलियासाठी 26 कसोटी, 198 वनडे व 14 टी-20 सामने खेळले. अँड्र्यू सायमंड्स त्याच्या आक्रमक फलंदाजीसोबत एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील होता.


Updated : 15 May 2022 2:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top