Home > News > 'बजाते रहो' अतुल भातखळकर यांच्या ट्विटची रंगली चर्चा..

'बजाते रहो' अतुल भातखळकर यांच्या ट्विटची रंगली चर्चा..

बजाते रहो अतुल भातखळकर यांच्या ट्विटची रंगली चर्चा..
X

शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकानाथ शिंदे नाराज असल्याचे वृत्ताने खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्रीपासून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे ११ आमदार नॉटरिचेबल असल्याचे वृत्त येत आहे त्यामुळे शिवसेनेची चिंता वाढली आहे. एकनाथ शिंदे भाजपच्या संपर्कात असल्याचे सुद्धा म्हंटले जात आहे या सगळ्यावर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांचा एक फोटो ट्विट केला आहे. त्या फोटोमध्ये संजय राऊत हे पेटी वाजवत आहेत या फोटोला त्यांनी 'बजाते राहो..' असं कॅपशन दिलं आहे. त्यांनी केलेल्या या ट्विटची सध्या समाज माध्यमांवर जोरात चर्चा रंगली आहे.

अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांचा जो फोटो ट्विट केला आहे त्या फोटोवर काय कमेंट आल्या आहेत ते देखील पाहूयात.

सुमेत आंबेकर हे ट्विटर वापरकर्ते म्हणत आहेत की, महाविकास आघाडीवर विश्वास ठेवणं कठिण आहे, सतत यांच्या विरोधी भूमिका इंस्टाग्राम, ट्विटर वर सुरु ठेवणं गरजेचे आहे. नाहीतर मविआ आपल्याला परत दगा देतील किंवा भ्रमात ठेवतील.यांना कळलं पाहिजे की विद्यार्थ्यांचं एक सेमेस्टरचं नुकसान यांना कायमचं सत्तेबाहेर करणार आहे.

सत्यजित सिंग राठोड यांनी सुद्धा बजाते रहो असं म्हणत हसणारा एक इमोजीचा फोटो शेअर केला आहे..

आकाश हे ट्विटर वापरकर्ते म्हणत आहेत की, शिवसेनेवर ही वेळ त्यांनीच तर आणली आहे

अशा प्रकारच्या अनेक कमेंट्स अतुल भातखळकर यांच्या ट्विट वर आल्या आहेत. काल संध्याकाळपासून एकनाथ शिंदे नॉटरीचेबल असल्याच्या बातम्या येत आहेत. ते व त्यांच्या संपर्कातील काही आमदार अहमदाबादच्या दिशेने रवाना झाल्याची वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ११ आमदार हॉटेलमध्ये आहेत, असेही समजते आहे.

Updated : 21 Jun 2022 7:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top