Home > News > महिलेला मूत्र पाजण्याचा प्रयत्न ; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार...

महिलेला मूत्र पाजण्याचा प्रयत्न ; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार...

महिलेला मूत्र पाजण्याचा प्रयत्न ; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार...
X

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे काही लोकांनी आधी एका महिलेला मारहाण केली आणि नंतर तिला मूत्र पाजण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर आरोपीने महिलेचा विनयभंग करत चप्पलने मारहाण केली. ही घटना पुण्यातील सुसगाव परिसरात घडली असून महिलेने आरोपीविरुद्ध हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

महिलेच्या तक्रारीवरून हिंजवडी पोलिस ठाण्यात ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सोमवारी सकाळपर्यंत ४ जणांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला सासरच्या मंडळींसोबत नातेवाईकाच्या घरी गेली होती. येथे काही गोष्टीवरून कुटुंबात वाद झाला आणि सासरच्या भावाने महिलेला शिवीगाळ सुरू केली. महिलेने विरोध केला असता प्रथम तिच्यावर हल्ला करण्यात आला.

विरोध केल्याने महिलेला खोलीत कोंडून ठेवले होते

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, महिलेला धडा शिकवण्यासाठी आरोपीने बाटलीत लघवी केली आणि नंतर महिलेला दारू पाजण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान विरोध केल्याने आरोपींनी महिलेला लाथही मारली. तर एका आरोपीने महिलेच्या डोक्यात काठीने वार केले. मारहाणीनंतर महिलेला अनेक तास एका खोलीत कोंडून ठेवले होते. याप्रकरणी 21 मे रोजी हिंजवडी पोलिस ठाण्यात चार महिलांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated : 23 May 2022 10:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top