Home > News > सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांच्या घरावर हल्ला

सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांच्या घरावर हल्ला

सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांच्या घरावर हल्ला
X

सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत सत्यभामा सौंदरमल यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

आपल्या भूमिकांनी कायम चर्चेत असणाऱ्या व महिला अत्याचाराविरोधात (Social Worker) काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल (Satyabhama Saundarmal) यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केला असल्याचे समोर आले आहे. याबाबत सत्यभामा सौंदरमल यांनी फेसबुक पोस्ट करून माहिती दिली आहे.

सत्यभामा सौंदरमल यांनी फेसबुक पोस्ट करून म्हटले आहे की, अज्ञात तीन-चार हल्लेखोरांनी मोटारसायकलवर येऊन आमच्या घरावर हल्ला केला. यावेळी आमच्या दारात उभ्या असलेल्या फोर व्हिलरच्या काचा फोडल्या. (Attack on the home of feminist social Worker Satyabhama Sundarmal)

कार्यकर्त्यांच्या घरावरील हल्ले हे अदखलपात्र गुन्ह्यात येतात. यामुळे घटनस्थळांचा पंचनामा ही होत नसतो. कार्यकर्त्यांचे खून झाल्यावर मग यंत्रणा जाग्या होतात, असं सत्यभामा सौंदरमल यांनी म्हटले आहे.

Updated : 16 Jan 2023 5:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top