Home > News > क्रूरतेचा कळस! लग्नाला विरोध केल्यानं मुलीच्या आईवर खुरप्यानं सपासप वार

क्रूरतेचा कळस! लग्नाला विरोध केल्यानं मुलीच्या आईवर खुरप्यानं सपासप वार

क्रूरतेचा कळस! लग्नाला विरोध केल्यानं मुलीच्या आईवर खुरप्यानं सपासप वार
X

राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना काही थांबायला तयार नाहीत. पुणे आणि मुंबईतील बलात्काराच्या घटना ( Rape Incident ) ताज्या असतानाच आता कोल्हापूरमध्ये मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. लग्नासाठी मुलीच्या आईनं विरोध केल्याचा राग आल्याने आरोपीने शेतात गवत आणायला गेलेल्या संबंधित महिलेवर खुरप्यानं सपासप असंख्य वार करत हल्ला केला. हा हल्ला इतका भयानक होता की, संबंधित महिला जागीच गतप्राण झाली आहे.

NEWS18LOKMAT ने दिलेल्या वृत्तानुसार, लता महादेव परीट असं हत्या झालेल्या 42 वर्षीय महिलेचं नाव आहे. तर गुरुप्रसाद देवराज माडभगत असं अटक केलेल्या 23 वर्षीय आरोपीचं नाव आहे. संबंधित आरोपी आणि मृत महिला दोघंही कोल्हापूर जिल्ह्याच्या आजरा तालुक्यातील आल्याचीवाडी येथील रहिवासी आहे. आरोपी माडभगत यानं काही दिवसांपूर्वी लता परीट यांच्या मुलीला लग्नासाठी मागणी घातली होती.

पण लता परीट यांना विवाहस्थळ पसंत नसल्यानं त्यांनी मुलगी देण्यास नकार देत विरोध केला. त्यामुळे आरोपी माडभगत याला मृत महिला लता परीट यांच्यावर राग होता. त्यामुळे आरोपीने लता परीट शेतात गेल्या असताना त्यांच्यावर हल्ला करत त्यांची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Updated : 11 Sep 2021 3:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top