Home > News > "नवऱ्याला घटस्फोट दे नाहीतर.." करुणा शर्मा यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

"नवऱ्याला घटस्फोट दे नाहीतर.." करुणा शर्मा यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

नवऱ्याला घटस्फोट दे नाहीतर.. करुणा शर्मा यांच्या  विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
X

करुणा शर्मा यांच्या विरोधात पुण्यातील येरवडा पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 23 वर्षीय महिलेने त्यांच्या विरोधात पतीसोबत घटस्फोट घेण्यासाठी जातीयवाचक शिवीगाळ करत, जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे दाखल केलेल्या तक्रारीत म्हंटल आहे.

नक्की प्रकरण काय आहे?

तक्रार दाखल केलेली महिला व त्यांचे पती हे उस्मानाबाद येथे राहायला होते. 2011 ला त्यांच्या पतीसोबत करुणा शर्मा यांची ओळख झाली. त्यानंतर तक्रारदार महिलेचे पती पुण्याला स्थायिक झाले. कालांतराने पतीचे करुणा शर्मा हिच्यासोबत प्रेम संबंध असल्याने पत्नीला समजले. त्यानंतर पतीने पत्नीचा छळ करण्यास सुरुवात केली. 'मी करुणा सोबत लग्न करणार आहे. तू मला घटस्फोट दे' असं सांगून तक्रारदार महिलेला त्याने त्यांच्या आईच्या घरी सोडले. घटस्फोट घेण्यासाठी तक्रारदार महिलेच्या पतीने तिच्या घरी येऊन बळजबरी केली असल्याचे सुद्धा पोलीस तक्रारीत म्हटले आहे.

त्यानंतर 24 एप्रिल 2022 रोजी एका कार्यक्रमाला जायचे आहे असं सांगून तक्रारदार महिलेला भोसरी या ठिकाणी नेण्यात आलं. तिथं करुणा शर्मा यांनी हॉकी स्टिक्सचा धाक दाखवत जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तक्रारीत अस सुद्धा म्हंटल आहे की, तक्रारदार महिलेने करुणा शर्मा यांना फोन लावला असता त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करत पतीला घटस्फोट देते नाही तर जीव गमवावा लागेल अशी धमकी दिल्याचं सुद्धा म्हटले आहे. या संपूर्ण घटनेचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त किशोर जाधव करीत आहेत.

Updated : 2022-06-20T10:32:14+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top