Home > News > बाप रे बाप ! वर्गात घुसला साप, सापाला पाहून विद्यर्थी व शिक्षक...

बाप रे बाप ! वर्गात घुसला साप, सापाला पाहून विद्यर्थी व शिक्षक...

बाप रे बाप ! वर्गात घुसला साप, सापाला पाहून विद्यर्थी व शिक्षक...
X

साप म्हंटल की अनेकजण भीतीने लटलट कापायला लागतात.. अनेक ठिकाणी तर साप पहिला की पहिला पळत जातात आणि हातात काठी घेऊन त्याला ठेचून टाकतात.. लोकांना साप या सरपटणाऱ्या प्राण्याविषयी आजही बरेच अज्ञान आहे. लोकांना विषारी आणि बिनविषारी सापांविषयी काहीच कल्पना नसते साप पहिला की नुसती आरडाओरड सुरु होते. साप जरी विषारी असला तरी त्याला मारून टाकणे हा पर्याय नाही. तुम्ही कोणत्याही सर्पमित्राला बोलावले तर ते येतात आणि त्याला पडकून त्यांच्या आदिवासात सोडून देतात. आज असाच एक प्रकार घडला एक साप चक्क शाळेत मुलांच्या वर्गखोलीत घुसला आणि मग काय घडलं तुम्हीच पहा...

कल्याण पश्चिमेतील शशांक विद्यालयात शाळा भरल्या नंतर वर्गात तास सुरु असताना विद्यार्थ्याच्या बेंच खाली एक साप शिक्षक व विद्यार्थ्यांना दिसला. विद्यार्थी व शिक्षकांची भीतीने चांगलीच तारांबळ उडाली. पुस्तके आणि स्कूल बॅग सोडूनच विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी ही शाळेच्या बाहेर धूम ठोकली. शाळेत साप असल्याची माहिती सर्प मित्रांना मिळताच सर्प मित्र दत्ता बॉम्बे यांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांच्या बेंच खाली लपलेल्या सापाला पकडले . साप पकडल्याचे पाहून विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सुटकेचा निश्वास घेतला. दरम्यान शाळेत पकडलेला साप हा बिनविषारी धामण जातीचा असून वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने लगेच त्याला जंगलात सोडले जाणार असल्याचे सर्पमित्र दत्ता बोबे यांनी सांगितले..

Updated : 16 March 2023 3:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top