Home > News > सहायक आयुक्तांवर फेरीवाल्याचा हल्ला, 3 बोटं तुटली

सहायक आयुक्तांवर फेरीवाल्याचा हल्ला, 3 बोटं तुटली

सहायक आयुक्तांवर फेरीवाल्याचा हल्ला, 3 बोटं तुटली
X

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणाऱ्या सहायक आयुक्तांवर फेरीवाल्याने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यामध्ये घडला आहे. ठाणे महापालिकेच्या माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंगळे यांनी आपल्या पथकासह कासारवडवली भागात अनिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली होती. याच दरम्यान एका फेरीवाल्याने त्यांच्यावर हल्ला केला. या फेरीवाल्याने धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पिंगळे यांची तीन बोटे तुटली आहेत. तसेच त्यांच्या डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली आहे. यामध्ये पिंपळे यांचे बॉडीगार्डही जखमी झाले आहेत.

हल्लेखोर फेरीवाल्याला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. तो ब्रम्हांड परिसरात राहत असल्याची माहिती मिळते आहे. सध्या या हल्लेखोर कासारवडवली पोलिसांनी मेडिकल तपासणमीसाछठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेले आहे, सहायक आयुक्त कल्पिता पिंगळे यांच्यावर ठाण्यामधील वेदांत रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्वरीत शासन करा: नांदगावकर

ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे व त्यांचे सहकारी यांच्यावर अमरजित यादव या अवैध फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात पिंपळे यांची बोट कापली गेली,कारण काहीही असो, असा हल्ला तो सुद्धा महिला अधिकारीवर करणाऱ्या या गुन्हेगाराला तारीख पे तारीख न देता त्वरित शासन करावे जेणेकरून अशा प्रवृत्तींना चाप बसेल, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत म्हंटले आहे.

Updated : 30 Aug 2021 3:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top