Home > News > "चित्रा वाघ आरोपींकडून खंडणी वसूल करायच्या" आशा मिरगे यांचा धक्कादायक आरोप..

"चित्रा वाघ आरोपींकडून खंडणी वसूल करायच्या" आशा मिरगे यांचा धक्कादायक आरोप..

चित्रा वाघ (Chitra Wagh) या संशयित आरोपी पद, पैसा, प्रतिष्ठेने मोठा असल्यास त्या प्रकरणांमध्ये लक्ष घालायच्या व पीडितेच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन तिला इमोशनल ब्लॅकमेल करून व वेळ पडली तर सदर आरोपिकडून खंडणी वसूल करायच्या असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादीच्या आशा मिरगे (Asha Mirge) यांनी केला आहे.

चित्रा वाघ आरोपींकडून खंडणी वसूल करायच्या आशा मिरगे यांचा धक्कादायक आरोप..
X

"चित्रा वाघ यांची ही जुनी पद्धत आहे. त्यांनी महिला अत्याचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये प्रतिष्ठित आरोपी सापडल्यास त्याच्याकडुन खंडणी देखील वसुल केली असल्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या आशा मिरगे यांनी केला आहे. "चित्रा वाघ या पीडितेच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन तिला भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करतात. आणि वेळ पडली तर त्या आरोपीकडून खंडणी सुद्धा वसूल करतात. मग त्यानंतर या प्रकरणाचं काय करायचं हे त्या ठरवतात. अशा प्रकारची ही पद्धत चित्रा वाघ अनेक वर्षांपासून वापरत आहेत व त्याच प्रकारे त्या काम करत आहेत" असा आरोप करत आशा मिरगे यांनी चित्रा वाघ यांच्यावर केला आहे.

राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या विद्या चव्हाण व त्यांच्या पक्षातील महिला नेत्यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आशा मिरगे बोलतं होत्या. यावेळी त्यांनी संजय राठोड प्रकरणावरून देखील चित्रा वाघ यांच्यावर आरोप केले त्या म्हणाल्या, संजय राठोड प्रकरणात मुलीने इमारतीवरून उडी मारल्याचं चित्रा वाघ यांना कसं माहित झालं? कुठल्याही प्रकरणात पीडित मुलीची ओळख उघड करायची नाही असा नियम असताना देखील चित्रा वाघ वारंवार पत्रकार परिषदांमध्ये पीडितेचे नाव घेत होत्या. त्यांनी अत्यंत सफाईदारपणे सर्वांना यामध्ये गुंतवून ठेवले आल्याचा आरोप मिरगे यांनी केला.

Updated : 15 April 2022 5:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top