Home > News > एकाच इमारतीत 20 टक्के कोरोनाबाधित असतील तर इमारत होणार सील...

एकाच इमारतीत 20 टक्के कोरोनाबाधित असतील तर इमारत होणार सील...

एकाच इमारतीत 20 टक्के कोरोनाबाधित असतील तर इमारत होणार सील...
X

राज्यात काल दिवसभरात कोरोनाचे 12,160 नवीन रुग्ण आढळलेत, तर 24 तासाच्या आत 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईत 8082 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. सोबत राज्यात 68 नवीन ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळलेत. यामध्ये मुंबईत 40 रुग्ण आहेत.

तर राज्यात काल सोमवारी ओमायक्रॉनचे 68 नवे रुग्ण आढळले आहेत. यातील 34 जणांचा रिपोर्ट इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च तर 34 रुग्णांचा रिपोर्ट नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सने (NCCS) प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार ओमायक्रॉनबाधितांमध्ये मुंबईतील 40, पुण्यातील 14, नागपूर 4, पुणे ग्रामीण आणि पनवेलमधील 3 रुग्ण आहेत. तर कोल्हापूर, नवी मुंबई, रायगड आणि सातारा याठिकाणीही प्रत्येकी एक ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळलेत. राज्यात एकूण आमोयक्रॉनबाधितांची संख्या 578 वर पोहोचली आहे.

BMC चे बिल्डिंग सिलिंगसाठी निर्देश

दरम्यान, BMC क्षेत्रात एखाद्या इमारतीत किंवा विंगमध्ये फ्लॅटच्या संख्याच्या तुलनेत 20 टक्के लोक कोरोनाबाधित असतील तर संपूर्ण इमारत किंवा विंग सील करण्याचे निर्देश BMC ने दिले आहेत. मुंबईमध्ये सध्या 11 कंटेनमेंट झोन आहेत , तर 318 बिल्डिंग सील केल्यात. मात्र रुग्णांची संख्या ज्या वेगाने वाढत आहे, ते पाहता बिल्डिंग सील करण्याचा आणि कंटेनमेंट झोनचा आकडाही वाढू शकतो.

Updated : 4 Jan 2022 5:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top