Home > News > Apple भारतात मोठी गुंतवणूक करणार..?

Apple भारतात मोठी गुंतवणूक करणार..?

Apple भारतात मोठी गुंतवणूक करणार..?
X

तैवानची बहुराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स कॉन्ट्रॅक्ट (Electronics Contract Manufacturing)निर्माता फॉक्सकॉनला Apple AirPods तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, अॅपलकडून वायरलेस इअरफोन आणि एअरपॉड बनवण्याच्या या डीलमुळे फॉक्सकॉन भारतात $200 दशलक्ष किंवा सुमारे 1हजार 654 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. फॉक्सकॉन वायरलेस इअरफोन आणि एअरपॉड्स बनवण्यासाठी भारतात कारखाना सुरू करणार आहे.

फॉक्सकॉन प्रथमच Apple Airpods पुरवठादार बनले आहे.. ( latest marathi news )

Apple साठी एअरपॉड्स आतापर्यंत अनेक चीनी उत्पादकांनी बनवले आहेत. आता Foxconn ही चीनबाहेर एअरपॉड्सची निर्मिती करणारी पहिली कंपनी असेल. मात्र, अॅपल किंवा फॉक्सकॉनकडून या वृत्तावर कोणतेही वक्तव्य आलेले नाही.फॉक्सकॉन ही जगातील सर्वात मोठी कॉन्ट्रॅक्ट इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक आणि सर्व Apple iPhones पैकी 70% असेंबलर आहे. फॉक्सकॉन आता प्रथमच Apple च्या AirPods चा पुरवठादार बनला आहे.

ऍपल तेलंगणात एअरपॉड्स निर्मिती प्रकल्प उभारणार आहे..

मीडिया अहवालानुसार, Foxconn भारतातील तेलंगणामध्ये Apple Airpods बनवण्यासाठी एक प्लांट तयार करेल, ज्यासाठी कंपनी $200 दशलक्षपेक्षा जास्त गुंतवणूक करेल. Apple ने Foxconn ला AirPods बनवण्यासाठी नक्की काय डील झाली आहेहे अद्याप समोर आलेलं नाही. फॉक्सकॉन व्यतिरिक्त, विस्ट्रॉन कॉर्प आणि पेगाट्रॉन कॉर्प सारख्या कंपन्या देखील एअरपॉड्स बनवण्याची ऑर्डर मिळविण्याच्या शर्यतीत सामील होत्या.

नवीन प्लांटमध्ये उत्पादन 2024 च्या अखेरीस सुरू होईल...

अॅपलने फॉक्सकॉनला भारतात उत्पादन प्रकल्प उभारण्याची विनंती केली होती, असे या अहवालात म्हटले आहे. Foxconn ची उपकंपनी 'Foxconn Interconnect Technology Limited' या वर्षाच्या उत्तरार्धात तेलंगणात उत्पादन प्रकल्प उभारण्याची योजना आखत आहे. त्याच वेळी, फॉक्सकॉनच्या या नवीन प्लांटमध्ये 2024 च्या अखेरीस उत्पादन सुरू होऊ शकते.

Updated : 20 March 2023 12:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top