Home > News > तृतीयपंथीय लाभार्थ्यांनी ओळखपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय लाभार्थ्यांनी ओळखपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय लाभार्थ्यांनी ओळखपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन
X

अहमदनगर // तृतीयपंथीयांचे कल्याण व हक्कांचे संरक्षण अंतर्गत पात्र तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळविण्यासाठी नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन या वेबसाईटला भेट देत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याणच्या सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी केले आहे.

तृतीयंपथीयांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी अधिनियम 2019 मधील नियम 2020 अंतर्गत विभाग 6 व 7 नुसार जिल्हास्तरीय समिती मार्फत ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्याचा नियम आहे.

सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग यांच्यामार्फत राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या वेबसाईटवर भेट देवून ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या ऑनलाईन अर्जासोबत आयकार्ड साईज फोटो, स्कॅन केलेली सही, आपण तृतीयपंथीय असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र, शासकीय रुग्णालयातील मानसोपचारतज्ञ यांनी दिलेला अहवाल व इतर आवश्यक कागदपत्रे जोडावे, असंही सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी म्हटलं आहे.

Updated : 5 Aug 2021 1:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top