Home > News > "आमच्या मागे उभे रहा" नाईक कुटुंबाची भावनिक साद

"आमच्या मागे उभे रहा" नाईक कुटुंबाची भावनिक साद

आमच्या मागे उभे रहा नाईक कुटुंबाची भावनिक साद
X

अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक यांनी मराठी माणसांना भावनिक आवाहन केलं आहे. हे भावनिक आवाहन करताना अक्षता नाईक म्हणाल्या, सत्य आपोआप बाहेर पडतं, सत्याचा विजय होतो. सत्यासाठी उभे राहा, मराठी माणसांनी पाठीमागे उभे राहावे, असं आवाहन अक्षता नाईक यांनी केलं आहे.

अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेले अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. तसंच मुंबई हायकोर्टानेही त्यांचा जामीन फेटाळला आहे. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक व मुलगी आज्ञा नाईक सत्र न्यायालयाच्या आवारात उपस्थित होत्या. यावेळी अक्षता नाईक यांनी मराठी जनांना हे भावनिक आवाहन केलं आहे.

मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने आज अर्णब यांना जामीन नाकारत त्यांचा अर्ज फेटाळला. यावेळी अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी सुरू केलेला फेरतपास बेकायदा नसल्याचे स्पष्ट निरीक्षणही कोर्टाने नोंदवले. या अनुषंगाने अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक व मुलगी आज्ञा नाईक यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

Updated : 9 Nov 2020 5:49 PM GMT
Next Story
Share it
Top