Home > News > ॲन्सी कबीरच्या आईचा आत्महत्येचा प्रयत्न ; ॲन्सीच्या Time to go पोस्टमुळे चर्चेला उधाण

ॲन्सी कबीरच्या आईचा आत्महत्येचा प्रयत्न ; ॲन्सीच्या Time to go पोस्टमुळे चर्चेला उधाण

ॲन्सी कबीरच्या आईचा आत्महत्येचा प्रयत्न ; ॲन्सीच्या Time to go पोस्टमुळे चर्चेला उधाण
X

'मिस केरळ 2019' या स्पर्धेची विजेती ॲन्सी कबीर (Ansi Kabeer) आणि उपविजेती अंजना शाजन (Anjana Shajan) यांचा दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर ॲन्सीच्या आईने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

ॲन्सी कबीरच्या आईने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना वेळेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. आम्हाला त्या बेशुद्ध अवस्थेत आढळल्या , आम्ही तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले, असं नातेवाईकांनी सांगितलं आहे.

दरम्यान शवविच्छेदनानंतर ॲन्सी आणि अंजना यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. ॲन्सी कबीरच्या नातेवाईकांनी सांगितले की, अपघाताच्या एक तास आधी तिने इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट ठेवली होती, "जाण्याची वेळ आली आहे (Time to go)" या पोस्टमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

31 ऑक्टोबरच्या मध्यरात्री व्हिटिला-पलारीवट्टम महामार्गावर झालेल्या अपघातात दोघींचाही जागीच मृत्यू झाला. एका दुचाकीला धडक दिल्यानंतर ॲन्सी आणि अंजना प्रवास करत असलेल्या कारचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून पलटी झाली. ज्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कारला अपघात झाला, दुचाकीस्वार जखमी अवस्थेत घटनास्थळावरुन पळून गेला.

Updated : 3 Nov 2021 5:19 AM GMT
Next Story
Share it
Top