Home > News > आणखी एक सुपरहिट जोडीने घेतला घटस्फोट; चाहत्यांचा हिरमोड

आणखी एक सुपरहिट जोडीने घेतला घटस्फोट; चाहत्यांचा हिरमोड

आणखी एक सुपरहिट जोडीने घेतला घटस्फोट;  चाहत्यांचा हिरमोड
X

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता आमिर खान ( aamir khan ) आणि त्याची पत्नी किरण राव ( kiran rao ) यांनी घटस्फोट घेतल्याने मोठी चर्चा झाली होती. त्यातच आता आणखी एक सुपरहिट जोडीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू ( Samantha Ruth Prabhu )आणि नागा चैतन्य ( naga chaitanya ) यांनी अखेर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने अनेक चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी घटस्फोट घेत असल्याची अखेर घोषणा केली. नागा आणि सामंथा यांनी आपापल्या सोशल अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.

दोघांनी ही आपल्या पोस्टमध्ये लिहलं आहे की, खूप विचारविनिमयानंतर, आम्ही पती -पत्नी म्हणून आपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आम्ही नेहमी एक चांगले मित्र म्हणून कायम सोबत राहू.

गेल्या काही दिवसांपासून हे कपल घटस्फोट घेणार असल्याच्य़ा चर्चेत होतं. अखेर या दोघांनीही घटस्फोट घेणार असल्याचं सोशल मीडियावर पोस्ट करून जाहीर केलं आहे. अनेक चाहत्यांची निराशा देखील झाली आहे. पण आपण मित्र म्हणून पुढेही सोबत राहू असे दोघांनी म्हंटल आहे.


Updated : 2 Oct 2021 12:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top