Home > News > कूनो नॅशनल पार्क मध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू...

कूनो नॅशनल पार्क मध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू...

कूनो नॅशनल पार्क मध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू...
X

मध्य प्रदेशच्या कूनो नॅशनल पार्क मध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्या चित्त्यांची संख्या आता नऊ झाली आहे. आतापर्यंत सहा चित्ते आणि तीन बछड्यांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशच्या वन विभागाने याबाबत निवेदन जारी करत माहिती दिली आहे. आपल्या देशातून नामशेष झालेला चित्ता प्रजातीचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारने कूनो नॅशनल पार्कमध्ये नाबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून २० चित्ते आणले होते. त्यानंतर त्यांना कूनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आलं होतं. त्यानंतर एका मादीने चार पिलांना जन्म देखील दिला होता. त्यामुळे या चित्त्यांची संख्या 24 झाली होती. मात्र यापैकी तीन पिल्ली आणि सहा मोठ्या चित्त्यांचा मृत्यू झाला. सध्या कूनो अभयारण्यात ७ नर आणि ६ मादी चित्ते जिवंत आहेत..

त्यातील एका चित्याचा आज मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेश वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी एक मादी चित्ता मृत अवस्थेत सापडला. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर चित्त्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे. आता सहा मादी चित्तापैकी एक चित्ता पिंजऱ्यात ठेवण्यात आला होता त्यानंतर त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात आले असून त्याच्यावर वन विभागातर्फे नजर ठेवली जात आहे. जंगलातील मादी चित्त्याला आरोग्य तपासणीसाठी पुन्हा पिंजऱ्यात ठेवलं जाण्याची शक्यता आहे.

Updated : 2 Aug 2023 10:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top