Latest News
Home > News > दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून पत्नीला रॉकेल टाकून जिवंत जाळले

दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून पत्नीला रॉकेल टाकून जिवंत जाळले

दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून पत्नीला रॉकेल टाकून जिवंत जाळले
X

राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना काही कमी होतांना दिसत नाही. त्यातच आता कौटुंबिक वादातून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सुद्धा समोर येत आहे. दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून एका व्यक्तीने आपल्या पत्नीला जिवंत जाळून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडीतील शांतिनगर परिसरात घडली आहे. कुंटूबाने तक्रार दाखल केल्यानंतर शांतिनगर पोलिसांनी शनिवारी आरोपीला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार फिरोज शेख नावाचा आरोपी हा नेहमी दारू पिऊन घरात पत्नी रुक्साना शेख सोबत वाद घालून मारहाण करत असे. तर भांडणानंतर तो पत्नीवर शारीरिक अत्याचार करीत असे. त्यामुळे रुक्साना शेख ह्या पतीला दारूसाठी पैसे देत नसे. गुरूवारी देखील दारूच्या पैशावरून दोघांमध्ये वाद झाला होता.

फिरोजने पत्नी रुक्सानाला दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र रुक्सानाने पैसे देण्यास नकार दिला, त्यातूनच दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. तर रागाच्या भरात आरोपीने पत्नीवर रॉकेल ओतले. आणि जिवंत पेटवले. रुक्सानाने या दरम्यान पळून जाण्याचा प्रयत्नही केला. आजुबाजूच्यांनीही तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत ती 90 टक्के भाजली होती. त्यानंतर तिचा मृत्यू झाला.

Updated : 2021-09-26T16:31:12+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top