Home > News > "आईच्या कष्टातून मिळाली अधिकारी होण्याची जिद्द.." अंगणवाडी सेविकेच्या मुलाची UPSC मध्ये बाजी

"आईच्या कष्टातून मिळाली अधिकारी होण्याची जिद्द.." अंगणवाडी सेविकेच्या मुलाची UPSC मध्ये बाजी

आईच्या कष्टातून मिळाली अधिकारी होण्याची जिद्द.. अंगणवाडी सेविकेच्या मुलाची UPSC मध्ये बाजी
X

आपण जर पाहिलं तर आपल्या अपयशासाठी परिस्थितीला जबाबदार धरणारे अनेक लोक आहेत. अपयश आलं तर त्याला खरंच परिस्थिती जबाबदार असते का? परिस्थिती नाजूक असेल तर आपण यशापासून नेहमी लांबच राहतो का? तर बिलकुल नाही.. तुम्ही म्हणत असाल की, परिस्थिती नाजूक असेल तर अनेक अडचणी तर येतातच त्यामुळे अनेक जणांना अपयश देखिले येतं. खरं तर परिस्थिती नाजूक असेल तर अडचणी येतात हे खरे आहे. मात्र या अडचणीत मात करण्याची ताकद सुद्धा ही परिस्थिती देत असते. आता हेच बघा ना अंगणवाडी सेविका असलेल्या आईची धडपड, महिलांना येणारे प्रश्न तसेच महिला व बालकांच्या समस्या पाहून प्रशासकीय सेवेत जावे व या समस्या सोडवण्यासाठी काहीतरी करावं या देहाने रोशन देशमुख या युवकाला पछाडले होते. आणि त्यांच्या ह्याच जिद्दीने त्यांने आत्ताच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे.

तर अंगणवाडी सेविकेच्या मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 551 वा क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन या सेवेत जायचं आणि महिला बालकांच्या समस्या सोडवण्यासाठी काहीतरी काम करायचं या ध्येयाने प्रेरित होऊन रोशन 2017 पासून या परीक्षेचा प्रयत्न करत आहे. यशापर्यंत रोशन इतक्या सहज पोचलेला नाही. त्याने या पूर्वी चार वेळा या परीक्षेसाठी प्रयत्न केले आहेत. चौथ्या प्रयत्नात रोशनला या परीक्षेमध्ये यश मिळाले आहे.

रोशनचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता..

रोशन हा उल्हासनगरचा आहे. याच परिसरातील एस.टी. महाविद्यालयाच्या जवळच असलेल्या एका चाळीमध्ये तो राहतो. त्याचे शालेय शिक्षण उल्हासनगरमधील उल्हास विद्यालयात झाले. शालेय शिक्षण पूर्ण होताच त्यांचे महाविद्यालयीन शिक्षणही उल्हासनगरच्या चांदिवली हिम्मतमल मनसुखानी महाविद्यालयात पूर्ण केलं. आणि त्यानंतर खारघरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची त्याने पदवी घेतली. यानंतर पुढे त्याने 2017 पासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी सुरू केली. आणि चार वर्षे अपार मेहनत केल्यानंतर त्याला आताच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळाला आहे.

Updated : 1 Jun 2022 7:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top