Home > News > घनदाट जंगलातून खडतर प्रवास, पाच डोंगर पार करून 'त्या' पोहोचल्या आरोग्य रक्षणासाठी

घनदाट जंगलातून खडतर प्रवास, पाच डोंगर पार करून 'त्या' पोहोचल्या आरोग्य रक्षणासाठी

घनदाट जंगलातून खडतर प्रवास, पाच डोंगर पार करून त्या पोहोचल्या आरोग्य रक्षणासाठी
X

मुंबई: पावसाळ्याचे दिवस त्यात घनदाट जंगल आणि पाच डोंगरांचा (hills) प्रवास डोळ्यासमोर आतानाही, नंदूरबार जिल्हातील (Nandurbar District) अतिदुर्गम भाग असलेल्या पिंपळखुटा येथे कर्तव्य बजावणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी आपल्या टीमसोबत तब्बल साडे चार तासांचा अंतर पार करत गावात जाऊन आपली जवाबदारी पार पाडली. त्यांच्या या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे.



शासनातर्फे दरवर्षी अतिगंभीर कुपोषित बालकांची शोधमोहीम कार्यक्रम ( screening health program ) राबवले जाते. त्यासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका याचं पथक गावात जाऊन गरोदर महिला, स्तनदा माता आणि बालकांच्या आरोग्याची माहिती घेतात. त्याचाच भाग म्हणून नंदूरबार जिल्हातील (Nandurbar District) अतिदुर्गम भाग असलेल्या नयामल, तलोदा, बीट- शीरवे येथील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सोबत घेऊन अंगणवाडी पर्यवेक्षिका सारिका दादर यांनी पाच डोंगरावरून तब्बल साडे चार तासांचा प्रवास करून गावात जाऊन आपलं कर्तव्य पार पाडले.

अतिशय दुर्गम भाग, पायवाट सुद्धा जेमतेम, डोंगर चढण्यासाठी काठीचा आधार, त्यात पावसाळी दिवसात अस्वल आणि सापांची भीती असते. तसेच डोळ्यासमोर पाच डोंगर आणि ते पार करून अंगणवाडीपर्यंत पोहचण्याचे काम तसं सोपं नव्हतं. पण आत्मविश्वास आणि गावातील बालकांपर्यंत पोहोचण्याच्या जिद्दीने या अंगणवाडी सेविकांनी गाव गाठत आपलं कर्तव्य पार पाडले.



साडेचार तासांचा प्रवास केल्यानंतर गावात पोहचल्यावर सुद्धा समोर अंगणवाडीपर्यंत पोहचण्यासाठी टेकडी सर करावी लागते. पण पाच डोंगर पार करून आलेल्या या रणरागिणींसमोर टेकडीपर्यंत पोहचणे काही अशक्य नव्हते. गावात गेल्यानंतर या पथकाने गावातील गरोदर महिला, स्तनदा माता यांच्यासोबत चर्चा करून मार्गदर्शन केलं. तसेच बालकांच वजन,उंची मोजून स्थानिक अंगणवाडी सेविका आणि पालकांना मार्गदर्शन केले.

आमच्या पथकात आरबीएसके पथक होते. ज्यात डॉ. वर्षा सुळे, मंगला दळवी यांच्यासह अंगणवाडी सेविका वंती वसावे सुद्धा होत्या. वरील या टीमचे हे कार्यक्षेत्र होते. पण एवढ्या अतिदुर्गम भागात सुद्धा ज्याप्रमाणे अंगणवाडी सेविका वंती आणि त्यांच्या सारख्या इतर इतर अंगणवाडी सेविका याचं काम कौतुकास्पद आहे. सारिका दादर, अंगणवाडी पर्यवेक्षिका

कोरोनाकाळात 'फ्रंटलाइन वर्कर्स' यांची कामगिरी महत्वाची ठरत आहे. त्यात अंगणवाडी सेविकांचे काम कौतुकास्पद म्हणावे लागेल. तुटपुंज्या पगारीवर काम करणाऱ्या या अंगणवाडी सेविका गावागावातच नव्हे तर जिथं शासनाची यंत्रणा सुद्धा पोहचत नाही, तिथे जाऊन आपलं कर्तव्य पार पाडतायत. त्यांच्या याच कार्याला 'मॅक्स वूमन'चा सलाम...

Updated : 11 July 2021 4:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top