Home > News > ...आणि पुण्याच्या सुगंधाताई झाल्या जट मुक्त

...आणि पुण्याच्या सुगंधाताई झाल्या जट मुक्त

...आणि पुण्याच्या सुगंधाताई झाल्या जट मुक्त
X

पुणे जिल्ह्यातील उरळीकांचन या गावातील सुगंधा सूर्यवंशी यांच्या डोक्यात गेली 17 वर्षांपूर्वी जट झाली होती. डोक्यात जट झाल्यानंतर त्यांनी गुरु केला आणि त्यासाठी पन्नास हजार रुपये खर्च केले. जट कापली तर घरावर वाईट संकटे येईल अशी भीती मनात केल्यामुळे या जट काढण्यास तयार होत नव्हत्या. जटेमूळे शारीरिक त्रास वाढत होता. पण मनात भीती असल्यामुळे डोक्यातील जट कापण्यास त्या तयार होत नव्हत्या.

...आणि पुण्याच्या सुगंधाताई झाल्या जट मुक्त

एक वर्षापूर्वी याच गावातील जट निर्मूलन केलेल्या महिलेची त्यांनी भेट घेतली. जट कापल्यानंतर त्यांच्यावर कोणतेही वाईट संकट आले नाही. याची खात्री केल्यानंतर सुगंधा यांनी नंदिनी जाधव यांना फोन करुन जट काढण्याची विनंती केली. रविवारी त्यांच्या घरी जाऊन नंदिनी जाधव यांनी सुगंधा यांच्या मनातील भीती दूर करून त्यांच्या डोक्यात असलेली जट काढून त्यांची जटेतुन मुक्तता करण्यात आली.

अज्ञान आणि अंधश्रद्धेतून सुगंधा यांच्या डोक्यात जट तयार झाली होती. मात्र जट हा देवीचा कौल असल्याने ती काढू नकोस, असं अनेक स्त्रियांनी सुगंधा यांना सांगितले. त्यानंतर 17 वर्ष त्यांनी आपल्या डोक्यातली जट मिरवली. परंतु नंतर जसं जसं समजत गेलं तसंतसं त्यांनी यातून बाहेर पडण्याचं ठरवलं. अखेर रविवारी डोक्यातील जट काढून अज्ञान-अंधश्रद्धेच्या जोखडातून त्या मुक्त झाल्या.

Updated : 23 Nov 2020 6:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top