Home > News > गोदी मिडीयाच्या विरोधात शेतकरी आक्रमक चित्रा त्रिपाठीना पळवून लावलं...

गोदी मिडीयाच्या विरोधात शेतकरी आक्रमक चित्रा त्रिपाठीना पळवून लावलं...

शेतकऱ्यांच्या महापंचायतीचे कव्हरेज करण्यासाठी आलेल्या प्रसिद्ध टीव्ही अँकर चित्रा त्रीपाठी यांना शेतकऱ्यांनी हुसकावले...

गोदी मिडीयाच्या विरोधात शेतकरी आक्रमक चित्रा त्रिपाठीना पळवून लावलं...
X

आज मुजफ्फरनगर मध्ये शेतकऱ्यांची महापंचायत चालू होती. या ठिकाणी कव्हरेज साठी प्रसिद्ध टीव्ही अँकर चित्रा त्रीपाठी या आल्या होत्या. त्या ठिकाणी अँकर त्रिपाठी पोहोचताच तेथे असणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांना विरोध करत त्यांना तिथून जाण्यासाठी भाग पडले. त्यांना तिथून माघारी पाठवत असतानाचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवरती व्हायरल होतोय. या व्हिडीओ मध्ये त्या तिथून जात आहेत व त्यांच्या पाठीमागे अनेक लोक हातात झेंडे घेऊन त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत. तेथील जमलेले लोक गोदी मीडिया हाय हाय अश्या घोषणा देत असल्याचे दिसत आहे.

या घटनेचा व्हिडीओ भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी प्रिती गांधी ट्विटर वरती शेअर करत ह्या घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी त्यांच्या ट्विट मध्ये म्हंटल आहे की, या ठिकाणी जन्मलेले जे शेतकरी आहेत ते स्वतःला शेतकरी म्हणत असले तरीसुद्धा ते गुंड प्रवृत्तीचे आहेत. शेतकऱ्यांच्या महापंचायतीला पाठिंबा देणारे सुद्धा या गैरव्यवहाराला तितकेच जबाबदार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.

Updated : 6 Sep 2021 5:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top