Home > News > Aryan Khan Drugs Case: NCB कडून अभिनेत्री अनन्या पांडेची आज तिसऱ्यांदा होणार चौकशी

Aryan Khan Drugs Case: NCB कडून अभिनेत्री अनन्या पांडेची आज तिसऱ्यांदा होणार चौकशी

Aryan Khan Drugs Case: NCB कडून अभिनेत्री अनन्या पांडेची आज तिसऱ्यांदा होणार चौकशी
X

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात ( mumbai cruise drug case ) शाहरुख खानचा ( shahrukh khan ) मुलगा आर्यन खान ( Aryan Khan ) आधीच तुरुंगात आहे, तर अभिनेत्री अनन्या पांडेचाही ( ananya pandey ) या प्रकरणात अडचणी वाढत आहेत. सोमवारी एनसीबीने अनन्या पांडेला बोलावले असून तिची तिसऱ्यांदा चौकशी होणार आहे. शुक्रवारी NCB ने अनन्या पांडेची सुमारे चार तास चौकशी केली. याआधी गुरुवारी एनसीबीने ड्रग क्रूझ प्रकरणात अनन्याची दोन तास चौकशी केली होती.

आर्यन खानच्या प्रकरणात अनन्या पांडेच्या नावाचा एका व्हॉट्सअॅप चॅटमध्ये उल्लेख करण्यात आला होता, त्यानंतर एनसीबीने तिच्या घरावर छापा टाकला आणि ऑफिसमध्ये बोलवून तिची चौकशी करण्यात आली. मीडिया रिपोर्टनुसार, अनन्या म्हणाली की तिने कधीही कोणत्याही मादक पदार्थ म्हणजेच ड्रग्सचे सेवन केले नाही. चौकशीदरम्यान अनन्या पांडे अनेकदा रडली असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.

यापूर्वी अनन्याची दोनदा चौकशी करण्यात आली आहे. तर आता आज पुन्हा तिला चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. त्यामुळे आज तिच्या चौकशीतून काय समोर येणार किंवा या प्रकरणात आता आणखी काय-काय समोर येणार हे पाहणे सुद्धा महत्वाचे आहे.

NCB ची कारवाई संशयाच्या भोवर्‍यात

आर्यन खानच्या प्रकरणात रोज नव-नवीन आरोप प्रत्यारोप होत आहे. तर NCB ची कारवाईबाबत संशय निर्माण केला जात असून, त्याबाबत अनेक व्हिडिओ आणि फोटो सुद्धा समोर आले आहे. त्यामुळे NCB ची कारवाई संशयाच्या भोवर्‍यात असून, याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Updated : 25 Oct 2021 4:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top