Home > News > यापुढे गुदासंभोग, मुखमैथुन अनैसर्गिक नाही.

यापुढे गुदासंभोग, मुखमैथुन अनैसर्गिक नाही.

यापुढे गुदासंभोग, मुखमैथुन अनैसर्गिक नाही.
X

वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये योनीद्वारे न होणाऱ्या सभोगला अनैसर्गिक असे संबोधले गेले होते. मात्र आता या या निर्णयामुळे इतर लैंगिक क्रियांना आता अनैसर्गिक असे म्हणता येणार नाही आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमात फक्त योनी द्वारे होणाऱ्या संभोगाला नैसर्गिक तर लैंगिक क्रियांना अनैसर्गिक असं संबोधलं जात होते. मात्र आता हा अनैसर्गिक शब्द न वापरण्याचा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने घेतला आहे. एमबीबीएसच्या न्याय वैद्यकशास्त्र या विषयातील गुदासंभोग, मुखमैथुन यासारख्या लैंगिक क्रियांच्या वर्गीकरणात आता अनैसर्गिक शब्दाचा उपयोग करता येणार नाही.

आधुनिक वैद्यकीय अभ्यासक्रमात इतर लैंगिक क्रियायांना अनैसर्गिक शब्द वापरण्यात येत होता. आता हा शब्द काढून टाकण्याचा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने घेतला आहे. डॉ. इंद्रजीत खांडेकर यांच्यासह इतर चार तज्ञांच्या समितीने शिफारस केल्यानंतर आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये योनीद्वारे न होणाऱ्या सभोगला अनैसर्गिक असे संबोधले गेले होते. मात्र आता या या निर्णयामुळे इतर लैंगिक क्रियांना आता अनैसर्गिक असे म्हणता येणार नाही आहे.

वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष अध्यक्ष अरुणा वाणीकर यांनी याबाबत एक तज्ञ समिती स्थापन केली होती. यामध्ये पाच तज्ञांचा समावेश करण्यात आला होता. या समितीने या संदर्भातील हा अहवाल दिला आहे.

Updated : 9 May 2022 4:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top